लॉकडाऊनमध्ये शेतीला आधार दुग्ध व्यवसायाचा

Smiley face 2 min

टीम ई ग्राम – कोरोना संकटाच्या काळात सर्वच उद्योग धंद्यांची अवस्था बिकट झाल्याची परिस्थिती आहे. मात्र, याला अपवाद ठरले आहे शेती क्षेत्र. लॉकडाऊनमुळे शेतीला दुग्ध व्यवसायाचा आधार मिळाला आहे. शिरूर तालुक्यातील पारोडी येथील प्रगतशील शेतकरी भानुदास टेमगिरे यांच्या कुटुंबाने सुमारे बावीस वर्षांपूर्वी एका गाईपासून दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर अत्यंत चिकाटीने ३५ गाई आणि म्हशी यांची संख्या वाढवून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. दूध विक्री आणि शेणखताच्या माध्यमातून वर्षाला मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सातत्यपूर्ण कामातून या कुटुंबाने परिसरात दुग्ध व्यवसायात वेगळा ठसा निर्माण केला आहे. सुनील टेमगिरे हे सध्या दुग्ध व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत.

वाचा:  कंगना पुन्हा बरळली; शेतकऱ्यांना म्हणाली दहशतवादी

दुग्ध व्यवसायाची सद्यस्थिती –
व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरुवातीला २५ लिटर दुधाचे उत्पादन होत असे. दुभत्या जनावरांची संख्या वाढल्यानंतर ३०० लिटर पर्यंत दुधाची विक्री करण्याचा संकल्प केला. आज लहान- मोठी संकरित एकूण ४० जनावरे आहेत. वार्षिक विचार करता प्रतिदिन दूध संकलन सुमारे २०० ते कमाल ३०० लिटर आहे. सर्व दूध सहकारी संघाला पुरवठा केले जाते. शेतात ऊस पिकाला प्राधान्य देण्यात आले आहे. तशेच जनावरांसाठी मका आणि गवत या पिकाला प्राधान्य दिले आहे.सर्व जनावरांसाठी आधुनिक पद्धतीचा मुक्त गोठा तयार केला आहे. कुटुंबातील सर्वजण या व्यवसायात कष्ट करीत आहेत.

वाचा:  कृषी विधेयकाविरोधात ३१ शेतकरी संघटनांनी पुकारला बंद

शेणखताचा उपयोग –
शेतातील पिकांना शेणखताचा उपयोग होतो. दरवर्षी सर्व जनावरांपासून सुमारे ५० ते ८० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यातील सुमारे ३० ट्रॉली शेणखताचा वापर शेतात केला जातो. तर उर्वरित खताची विक्री केली जाते. खताला बाजारभाव ही चांगला मिळतो. खत विक्रीतून बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. ऊस शेती आणि दुग्ध व्यवसायाची जोड यामुळे कुटुंबाची आर्थिक भरभराट करणे शक्य झाले आहे. शेतातून जनावरांना चारा आणण्यासाठी आणि शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. मुलांना चांगले शिक्षण देता येत आहे.

वाचा:  कंगना राणावतला भेटणारे राज्यपाल शेतकरी पुत्राला भेट देणार का? शेतकरी तरूणाचे पत्र

सध्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनचा फटका शेतीासह दुग्ध व्यवसायिकांना सोसावा लागत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अडचणीच्या काळातही हार न मानता व्यवसाय टिकून ठेवण्यात यश आले आहे. व्यवसायाच्या जोरावरच शेतीचा विकास झाला. शेणखताच्या वापरातून जमीन सुपीक होण्यास मदत झाली. कोणत्याही व्यवसायात सातत्य आणि चिकाटी महत्वाची असून, अनेक अडचणींवर मात करत दुग्ध व्यवसाय जोपासला. त्यामुळे प्रगती साधता आल्याचे टेमगिरे यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App