धोकादायक गावांचे होणार सक्तीने पुनर्वसन – उपमुख्यमंत्री अजित पवार

Smiley face < 1 min

सातारा : अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होणाऱ्या डोंगरपायथ्यावरील गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्याबाबत शासन निर्णय घेत असून, वेळ पडल्यास पश्चिम महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यातील अशा डोंगरपायथ्यावरील गावांचे सक्तीने पुनर्वसन केले जाईल. त्यासाठी शासकीय जमिनीचा वापर केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान, अतिवृष्टीतील मृतांच्या नातेवाइकांना नऊ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:  “जनधनमुळे शासनाची मदत गरजूंपर्यंत पोहोचली”

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (ता.२७) सायंकाळी साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

egram

पवार म्हणाले, ‘‘नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आणखी आठ ते दहा दिवस या पंचनाम्यांना लागतील. मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असून, ते अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नऊ जिल्ह्यांबाबत निर्णय जाहीर करणार आहेत. सध्या अतिवृष्टीतील मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून पाच लाख, केंद्र सरकारकडून दोन लाखांची मदत, तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन लाख, असे एकूण नऊ लाखांची मदत दिली जाणार आहे. यापैकी पाच लाखांचे वाटप सध्या जिल्हानिहाय सुरू करण्यात आले आहे.’’

वाचा:  ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा घाट

अजित पवार उवाच…
१) अतिवृष्टी बाधितांच्या कोरोना लसीकरणाला प्राधान्य देणार.
२) धोकादायक गावांचे सक्तीने पुनर्वसन करण्याचा विचार.
३) मिरगावातील १५० कुटुंबांचे कायमचे स्थलांतर कोयनेतील पाटबंधारे विभागाच्या जागेत होणार.

४) सांगली जिल्ह्यातील दोन लाख लोकांचे स्थलांतर.
५) उर्वरित सर्व जिल्ह्यांतील मिळून साडेतीन लाख लोकांचे स्थलांतर.
६) सातारा जिल्ह्याला शंभर कोटी रुपयांचा निधी देणार.

वाचा:  मोठी दुर्घटना! बोट उलटल्याने ११ जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App