दत्तात्रेय भरणेंचा पलटवार, म्हणाले…

Smiley face 2 min

पुणे – कोरोना महामारीच्या संकटात तालुक्यातील जनतेला दमडीचीही मदत न करणाऱ्या विरोधकांनी जनतेविषयी पुतना मावशीचे प्रेम दाखवून कळवळा आणू नये, असा पलटवार सामान्य प्रशासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केला. हर्षवर्धन पाटील यांनी २८ जुलैला राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर कोरोना काळात सुरफाट्या खेळणे, पतंग उडविण्या वरून टीका केली होती. त्यास राज्य मंत्री भरणे यांनी उत्तर दिले आहे.

भरणे म्हणाले की, कोरोना संचारबंदी काळात अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे जनसेवक म्हणून मागील चार महिन्यापासून प्रत्येक गावात गरजू कुटूंबांना जीवनोपयोगी अन्नधान्य किट वाटप केले. मात्र, ज्या जनतेच्या जोरावर विरोधकांनी वीस वर्ष लोक प्रतिनिधी म्हणून काम केले, ज्यांच्याकडे सहकारीसंस्था आहेत, त्यांनी मात्र गोरगरीब जनतेला मदत न करता कोरोना काळात विधान परिषदेवर वर्णी लागावी म्हणून भाजपा नेत्यांकडे दिल्ली आणि मुंबई येथे वाऱ्या करण्यात धन्यता मानली. त्यामुळे त्यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.

वाचा:  भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर; नवाब मलिकांचा दावा

कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आम्ही १० हजार बाटल्या रक्त संकलन केले. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले. राज्यात रक्त संकलन, जीवनावश्यक वस्तू वाटप केले. त्यामुळे सर्वत्र इंदापूर पॅटर्नचे कौतुक झाले. विरोधक मात्र घरात बसून राहिले, त्यांनी एक बाटली रक्त देखील गोळा केले नाही. कोरोनाच्या काळात युवकांमध्ये उत्साह वाढावा ,त्यांची भीती कमी व्हावी म्हणून सुरक्षित अंतर ठेवून सूरफाट्या खेळलो, असेही भरणे म्हणाले.

वाचा:  खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, नागपूरवरून मुंबईला हलविले

कोरोना संसर्ग तालुक्यात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांमार्फत सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका नियमितपणे घेतल्या जात आहेत. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्या भागात जाऊन नागरिकांशी चर्चा केली आहे. रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित पुरवल्या आहेत. याउलट विरोधकांनी कोरोनाबाधित ठिकाणी न जाता नगरपरिषद आणि तहसिल कार्यालयात कोणताही अधिकार नसताना बैठका घेऊन प्रसिद्धी मिळवली. प्रसिद्धीची हाव कोणाला आहे हेतालुक्यातील जनतेला गेल्या २० वर्षांपासून माहितीआहे.

वाचा:  अजित पवार राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत

विधानसभा निवडणुकीत दोन वेळा जनतेने विरोधकांचा राजकीय पतंग काटून त्यांचा सूर घालवला आहे. त्यांचा पतंग पुन्हा आकाशात कधी उडणार नाही, याची काळजी जनता घेत आहे . त्यामुळे विरोधकांनी टीका न करता विश्रांती घ्यावी, अशी खरमरीत टीका भरणे यांनी केली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App