कृषी पदविकेची परिक्षा रद्द करण्याची मागणी

Smiley face < 1 min

ई ग्राम : गेल्या अडीच महिन्याापासून कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकासह विद्यार्थ्यामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कृषी तंत्र निकेतन पदविका अभ्यासक्रम वर्ष तिसरे (डिप्लोमा) परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

कृषी पदविकेच्या शेवटच्या वर्षात अनेक विद्यार्थी शिकत असून करोनामुळे 30 जून 2020 पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे परीक्षा घेऊ नयेत, असे शासनाने सांगितले आहे. परंतु 8 जून 2020 रोजी राहुरी विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकात सहा जुलै ते अकरा जुलै 2020 मध्ये परीक्षा द्यावी असे या पत्रात नमूद केले आहे.

वाचा:  प्रियंका गांधींबाबत भाजप सरकारचे हीन राजकारण : बाळासाहेब थोरात

परंतु मुलांच्या आरोग्यासाठी ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी पत्राद्वारे पालकांनी कृषी तंत्रनिकेतन पदविका (डिप्लोमा) विभागाकडे केली आहे. इतर सर्व बीए, बीकॉम, बीएससी या सर्व शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद करण्याचा निर्णय झाला आहे. त्याच धर्तीवर कृषी तंत्र निकेतन (कृषी तंत्रज्ञान पदविका) अंतिम वय वर्षाच्या देखील लेखी परीक्षा रद्द करून मागील सत्राच्या सरासरी वरून विद्यार्थ्यांना गुणदान (मार्क) द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

राज्यातील देशातील परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांमध्ये करोनासंबधी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालय मध्ये शिकणारे विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमधील असल्यामुळे करोना प्रादुर्भावाची शक्यता आहे. परीक्षा वाला सोशल डिस्टन्स व सुरक्षितता बोलणे शक्य होणार नाही. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची राहण्याची व जेवणाची सोय होणे शक्य नाही.

वाचा:  ‘सत्ता अबाधित ठेवायची असेल, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना परत पाठवा’

सध्याची करोनाची परिस्थिती पाहता वाहतूक तसेच जिल्हाबंदी असल्याने बन्याच विद्यार्थ्यांना भविष्यकाळात प्रवास करून परीक्षा देणे शक्य होणार नाही, त्यामुळे कुठलाही पालक आपल्या पाल्यांना करोनाच्या भीतीने परीक्षेकरिता पाठवण्यात असमर्थ ठरत आहे. पुणे जिल्ह्यातील शारदानगर, बावडा, मांडवगण फराटा, मोराची चिंचोली, नारायणगाव व भोर या सहा महाविद्यालयाकरिता आपल्याकडून वरील सर्व बाबींचा विचार करून संबंधितांना परीक्षा रद्द करण्याबाबत निर्देश द्यावेत आणि सर्व सेमिस्टरची सरासरी करून गुण देत निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, कृषी मंत्री यांना पत्र माहिती दिली आहे. ही परीक्षा रद्द होण्याबाबत कृपा तंत्र निकेतन पदविका विभाग यांच्याकडे देखील अनेक पालकांनी पत्राद्वारे मागणी केली आहे

वाचा:  शेतकरी कर्जमाफीसाठी दोन हजार कोटी वितरीत; उर्वरित शेतकऱ्यांना लाभ

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App