राज्यातील बेघर तसेच स्थलांतरित कुटुंबांना तात्काळ मदत करण्याची मागणी

ईग्राम : देशातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बेघर तसेच स्थलांतरित कुटुंबांना तात्काळ मदत करण्याची मागणी ऐआयएसफने पत्रा द्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे याच बरोबर महाराष्ट्र शासन कोरोना विषाणू विरोधात दाखवत असलेल्या तत्परतेबद्दल राज्य शासनाने मनःपूर्वक आभार मानले. सर्वसामान्य नागरिकांना किंबहुना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांकरिता पुढील २ महिन्यांचे धान्य रेशन दुकानांच्या माध्यमातून देण्याच्या निर्णयाने नक्कीच राज्यातील वंचित घटकांना आधार मिळेल, त्याबद्दल अभिनंदन केले. परंतु राज्यातील विविध महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या बेघर किंवा स्थलांतरीत कुटुंबांसाठी राज्य शासनाच्या मार्फत अद्याप कोणतेही ठोस असे पाऊल उचलले गेलेले नाही याबद्दल चिंता व्यक्त केली . राज्यातील संचार बंदीमुळे हातावर पोट असलेल्या या बेघर कुटुंबांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, त्या अनुषंगाने खालील मागण्यां ऐआयएसफ ने केल्या

१) स्थानिक प्रशासनामार्फत सदर कुटुंबांची ओळख करून त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे. यासाठी महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचा, स्थानिक प्रशासनाच्या मिळकतींचा वापर करणे. सदर कुटुंबांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था करावी.
2) त्यांना मास्क व सॅनिटाइजर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे.
3) राज्यातील आर्थिक मागासांसाठी १० रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात यावी, गरज भासल्यास केरळच्या धर्तीवर कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी.

फोटो : कोरोना मुळे बेघर आणि मंजुराची होरपळ

Read Previous

७ वर्षाहून कमी शिक्षा असलेले ११ हजार कैदी मुक्त होणार..

Read Next

अहमदनगर ब्रेकिंग : २११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह