आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर होणारी पायी वारी यावर्षी रद्द करण्यात आली.मात्र ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने मोजक्या 20 जणांना संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुकांसह परवानगी देण्यात आली आहे.त्यानुसार मंगळवार (ता.30)आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संत निवृत्तीनाथांच्या पादुकांनी शिवशाही बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

सकाळी प्रस्थानापूर्वी संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजर करीत नाथांच्या चांदीच्या प्रतिमेसह पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आले.त्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील पवित्र कुशावर्त कुंडात नाथांच्या पादुकांना स्नान घालण्यात येऊन विधिवत पूजा करण्यात आली.रवाना होण्यापूर्वी परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन नाथांच्या पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.

वाचा:  आशियातील सर्वात मोठ्या योट्टा डेटा सेंटरचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

कोरोनामुळे पायी वारीने न जाता यावर्षी पादुका शिवशाही बसमधून पंढरपूरला नेण्यात येत आहेत.या पादुकांसोबत पंढरपूरला जाण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य,विणेकरी,ध्वजकरी, टाळकरी आणि व्यवस्थापकांसह जणांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर, समाधी मंदिर विश्वस्त व नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर,नगरसेवक पप्पु शेलार,श्याम गंगापुत्र,मधुकर लांडे,त्रंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांसह वारकरी उपस्थित होते.

वाचा:  सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 3824 पदांची होणार हंगामी भरती

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App