‘डिपॉझिट जप्त केलंय, कशाला बोलायचं’; पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Smiley face < 1 min

सातारा :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

आज शरद पवार यांनी सातारा दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त केले आहे, कशाला बोलायचं.”

वाचा:  उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, भाजप आमदार पडळकर यांनी ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत’ अशी जहरी टीका पडळकरांनी केली होती.

वाचा:  मराठा आरक्षणाचा निर्णय विरोधात गेल्यास सरकारविरोधात आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App