वारणा दूध संघामार्फत १ लाख दूध उत्पादकांना होमिओपॅथी औषधांचे वाटप

Smiley face < 1 min

ई ग्राम : वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, विजापूर,बेळगांव आदी जिल्हयातील सुमारे १ लांखाहून अधिक दूध उत्पादकांना अर्सेनिक अल्बम -३० या होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली.

सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी वारणा दूध संघाने कार्यक्षेत्राबरोबरच दुग्धालयात सोशल डिस्टस्टींगचे सर्व नियम पाळून कामकाज सुरु ठेवले होते.संघास दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना होमिओपॅथी औषध देण्याचा निर्णय संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे,उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी व संचालक मंडळाने घेतला आहे.

वाचा:  ‘देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही’

जिल्हा बंदी असताना वारणा दूध संघाचे सांगली जिल्ह्यातील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यस्थळावर अडीच महिने निवास व भोजनाची व्यवस्था संघामार्फत करण्यात आली.यामुळे संघाला आर्थिक तोटा सहन करावा लागला. सध्या कोरोनाने ग्रामीण भागात पाय पसरल्याने दूध -उत्पादक व कुटुंबांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे योनी संघास दूध पुरवठा करणांऱया कोल्हापूर,सांगली, सातारा, सोलापूर , विजापूर,बेळगांव . जिल्ह्यातील १ लाखांहून दूध उत्पादकांना असेंनिक अल्बम -३०या औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

वाचा:  ‘सत्ता अबाधित ठेवायची असेल, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना परत पाठवा’

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App