बळीराजाचा सन्मान करणाऱ्या पुरस्कारांबाबत तुम्हाला माहितेयं का?; जाणून घ्या

Smiley face 5 min

टीम ई ग्राम – दरवर्षी राज्यात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारांकरीता प्रस्ताव सादर करणेबाबत कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सुचना काय आहेत हे आज आपण जाणून घेऊ.  

१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या कार्याला अभिवादन म्हणुन त्यांच्या १०१ व्या जयंतीचे निमित्त साधून २००० सालापासून राज्यातील कृषिक्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ति किंवा संस्थेस डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा राज्याच्या कृषि विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या व्यक्ति, गट, संस्थेला  ७५  हजार रूपयांचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

निकष
१) हा सर्वोच पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्ति/ गट/संस्थेस देण्यात येतो. त्याअनुषंगाने व्यक्ती/गट/संस्था यांचे कार्य अतिउल्लेखनिय असावे.
२) सर्वसाधारणपणे मागील २०-२५ वर्षामध्ये शेतीचा अनुभव असलेल्या व्यक्ती/ गट/ संस्थेला प्राधान्य दिले जाते.
३) व्यक्ती /गट/संस्थेचे कृषि उत्पादन, कृषी विस्तार, निर्यात कृषी प्रक्रिया, पीक फेरबदल, कृषी उत्पादन वाढीसाठी वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्यामधील त्यांचे कार्य तसेच समाजातील स्थान याबाबत सर्वंकष विचार केला जातो.
४) कोरडवाहू क्षेत्रातील कार्य आणि कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करणे आवश्यक.

५) सदर पुरस्कारार्थीच्या शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा इतर शेतकऱ्यांना होणारा फायदा.
६) कृषि विपणन, प्रक्रिया, काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब तसेच याबाबत कार्य इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक असावे.
७) कृषि क्षेत्रातील कार्य संघटनात्मक आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
८) शासकीय किंवा शासन अंगीकृत आणि सहकार संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी व्यक्ती किंवा संस्था पात्र असणार नाही.
९) शासनाकडून दिलेल्या पुरस्काराला किमान ५ वर्ष कालावधी पुर्ण झालेला असावा.
१०)  प्रस्तावित शेतकरी गट संस्था शेतकरी मासिकाचे सभासद असावेत.

११)  प्रस्तावित शेतकरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीचा चरित्राचा दाखला मूळ प्रति तच सादर करणे आवश्यक आहे.
१२) प्रस्तावित शेतकरी शासन किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसल्याबाबत १०० रूपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र देण्यात यावे.
१३) प्रस्ताव सादर करताना त्यामध्ये ७-१२, ८-अ- मुळातीत जोडणे अनिवार्य राहील अपवादात्मक स्थितीत संस्था किया गट यांचे बाबतीत ७-१२, ८-अ ऐच्छिक राहिल.

वाचा:  राज्याच्या ‘या’ भागात येत्या दोन दिवसात मुसळधार; जाणून घ्या कोणकोणत्या भागात 'अलर्ट'

२) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार
कृषी संचालनालयाच्या स्थापनेस १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ १९८४ सालापासून कृषि व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय आणि सहकार व ग्रामीण विकास या क्षेत्रात अति उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती/संस्थेस वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. सध्या या पुरस्काराची संख्या १० आहे. प्रत्येक पुरस्कारर्थ्यांला ५० हजार  रूपये रकमेचे पारितोषिक स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्निक सत्कार करण्यात येतो, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

निकष –
१) कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणारे शेतकरी / गट / संस्था असावेत आणि त्यांचे कार्य संपुर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
२) प्रस्तावित शेतकरी हा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार प्राप्त शेतकरी असावा.
३) शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराला किमान ५ वर्षे पेक्षा जास्त कालावधी पुर्ण झालेला असावा.
४) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकारी संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारे व्यक्ती, गट, संस्था पात्र असणार नाही.

५) प्रस्तावित शेतकरी, गट, संस्था शेतकरी मासिकाचे सभासद असावेत.
६) प्रस्तावित शेतकरी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतितच सादर करणे आवश्यक आहे.
७) प्रस्तावित शेतकरी शासन किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसल्याबाबत १०० रूपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र देण्यात यावे.य
८) प्रस्ताव सादर करताना त्यामध्ये ७-१२, ८-अ मुळप्रतित जोडणे अनिवार्य राहील अपवादात्मक स्थितीत संस्था किंवा गट या बाबतीत ७-१२, ८- अ ऐच्छिक राहिल.

३) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
राज्यातील शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती आणि प्रगतीत उत्पादनावाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे. तसेच तो सातत्याने वाढत असून शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेती विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब तसेच शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने कृषि क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना १९९५ सालापासून जिजामाता कृषिभुषण पुरस्कार देण्यात येतो. राज्यातुन दरवर्षी ५ महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पतीसह सरकार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वाचा:  संसदेत ‘पेगॅसस’ प्रकरण पेटले; पेगॅसस प्रकरण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

निकष –
१) कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या महिला शेतकरी असाव्यात आणि त्यांचे कार्य संपुर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
२) प्रस्तावित महिला शेतकरीही वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार प्राप्त शेतकरी असावी.
३) शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराला किमान ५ वर्षे पेक्षा जास्त कालावधी पुर्ण झालेला असावा.
४) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी व्यक्ति/संस्था पात्र असणार नाही.

५) प्रस्तावित महिला शेतकरी ही शेतकरी मासिकाची सभासद असावी.
६) प्रस्तावित महिला शेतकरी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.
७) प्रस्तावित महिला शेतकरी शासन किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसल्याबाबत १०० रूपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावे.
८) प्रस्ताव सादर करताना त्यामध्ये ७-१२, ८-अ मुळातीत जोडणे नवीन अनिवार्य राहिल.

४) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषि क्षेत्रात विस्तार आणि मार्गदर्शनाथावत बहुमोल कामगिरी करणारे शेतकरी/व्यक्ती/संस्था त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी सल्ला घरगुती उद्योग उदा. कुक्कुट पालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील वैशिष्टपुर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच खेड्यांमधुन परसबाग वृद्धींगत करणाऱ्या महिला इत्यादींना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फफ १९९४ सालापासून वसंतराव नाईक शेतीमित्र हा बहुमान प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. तसेच ३०  हजार रूपये रोख रक्म, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

निकष –
१) कृषी क्षेत्रातील कार्य संघटनात्मक आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
२) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी व्यक्ति/संस्था पात्र असणार नाही.
३) खेड्यामधुन परसबाग वृद्धींगत करणाऱ्या महिलांचाही विचार या पुरस्कारासाठी करण्यात येतो.

वाचा:  धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच; मराठवाडा, विदर्भात पावसाची उसंत

४) कृषी विज्ञान मंडळ किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या गावात सक्रिय आहे त्या मंडळाच्या, कंपन्यांच्या क्रियाशील सभासदांना, प्रमुखांचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात येतो.
५) कृषिविषयक दैनिक, साप्ताहिक मासिकामधुन लिखाणाद्वारे किंवा विविध स्तरावरील शेतकरी मेळावे, चर्चासत्र, प्रदर्शन माध्यमातून जास्तीतजास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ति, संस्था यांचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात येतो.
६) शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराला किमान ५ वर्षे पेक्षा जास्त कालावधी पुर्ण झालेला असावा ७) शासनाच्या कृषि विभागामार्फत तसेच आत्मा अतर्गत राबविण्यात आलेल्या शेतीशाळांमधील सुलभक्तों समन्वयक, शेतकरी यांचा विचार या पुरस्कारासाठी करता येईल.
८) प्रस्तावित शेतकरी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
९) प्रस्तावित शेतकरी शासन किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी फरत नसल्याबाबत १०० रूपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र देण्यात यावे. प्रस्ताव सादर करताना त्यामागे ७-१२, ८ अ मुळप्रतित जोडणे ऐच्छिक राहील.  

५) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
पुरस्काराचे स्वरुप – शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवनवीन पद्धतीने पीक लागवड, इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शासन, सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर इत्यादी निकष अंतर्गत शेतकन्यांचे एकत्र कार्य विचारत घेऊन राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच ११ रूपये रोख रकमेसह, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

निकष
१) शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि तो कुटुंबीयासह शेती करणारा असावा.
२) प्रस्तावित शेतकरी हा शेतीपुरक धंद्याव्यतिरिक्त इतर कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करणारा नसावा.
३) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी व्यक्ति पात्र असणार नाही.

४) आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
५) सर्वसाधारण आणि आदिवासी अशा दोन्ही गटाच्याबाबतीत ५ किंवा त्याहून जास्त सालदार ठेवणारा शेतकरी नसावा.
६) प्रस्तावित शेतकरी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा चारित्र्याचा दाखला मूळ प्रतितच सादर करणे आवश्यक आहे.
७) प्रस्तावित शेतकरी, गट, संस्था शेतकरी मासिकाचे सभासद असावेत.
८) प्रस्तावित शेतकरी शासन किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसल्याबाबत १०० रूपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रस्ताव छाननी आणि निवडीकरीता तालुका, जिल्हा, विभाग, आयुक्तालयस्तरावरील समित्यांमार्फत कार्यवाही होऊन शासनस्तरावर अंतिम निवडीकरीता शिफारशी सह पाठविले जातात.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App