महसूल विभागाचा अजब कारभार, शेतकऱ्याला ठोठवला तब्बल साडेसहा कोटींचा दंड!

Smiley face < 1 min

ई ग्राम : पुणे  जिल्ह्यातील हवेली तालुक्यात जमिनीच्या किमतीपेक्षाही अधिक दंड ठोठावल्याचा प्रताप समोर आला आहे. शेतकऱ्याने 4 एकर 17 गुंठे जमिनीवर वाळू उपसा केल्याप्रकरणी सुमारे 6 कोटी 57 लाख 32 हजार 913 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हवेली तालुक्यातील जेमतेम 1870 लोकसंख्या असलेल्या बुर्केगावच्या सर्वसामान्य कुटुंबातील धोंडीबा मारुती वाघमोडे हे शेतकरी आपली शेती कसून आपली उपजीविका करतात. वाघमोडे यांची परिस्थिती ही हालाखीची असल्याने त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून सन 2019 ते 2019 या काळात घरकुल मंजूर झाले. त्यांना हे घरकुल बांधण्यासाठी वाळूची आवश्यकता असल्याने त्यांनी आपल्याच शेतात वाळू काढण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हाच निर्णय आता त्यांच्या अंगलट आला असून त्यांना हवेली तहसिलदारांनी अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी 6 कोटी 57 लाख 32 हजार 913 रूपयांचा दंड ठोठावला आहे.

हवेलीचे तहसीलदार सुनिल कोळी यांना याबाबत विचारले असता, नको त्या बाबतीत प्रश्न विचारू नका. माझ्या कार्यकाळात इतक्या मोठ्या प्रकारचा दंड ठोठावला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले. माञ दंडाच्या वसुलीसाठी पाठवलेल्या नोटीसावर माञ सुनिल कोळी यांची सही दिसत आहे. एकीकडे वाळूमाफीया मोकाट फिरत असून बेसुमार वाळू उपसा करत आहेत. एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड करने चुकीचे असल्याचे शिरूर हवेलीचे लोकप्रतिनीधी आमदार अशोक पवार यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. तर हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे अपील करावे निश्चितच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

सरकार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करते. माञ दुसरीकडे या सर्व प्रकारानंतर शेतकरी शासकीय कार्यालयाचे उबरठे झिजवून थकला. परंतु न्याय काही मिळाला नाही अखेरीस न्याय न मिळाल्यास आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी बोलत आहे. एकीकडे वाळू माफिया सर्रास मोकाट फिरत असताना एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर जमिनीच्या किंमती पेक्षा ही जास्त दंड आकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाचा:  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे; भाजपाची मागणी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App