घाबरू नका! भारतात इटली, अमेरिकेसारखी मृतांची संख्या नसणार; कारण…


ई ग्राम :
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे. भारतातील नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पण आता देशवासियांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरीदेखील मृतांचा आकडा वाढणार नाही, असा दावा एका डॉक्टरांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्वच राज्यांत याची अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. सध्या देशात ६६५ रुग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आता आयसीएमआरचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स इम्युनोलॉजीचे माजी डीन डॉ. नरिंदर मेहरा यांनी एक दावा केला आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे.

या कारणांमुळे कमी असणार मृतांची संख्या…
भारतात कोरोनामुळे मृतांची संख्या कमी असण्याची कारणेही समोर आहेत. यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार प्रणाली आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. भारतात हळद, आले, मसालेदार अन्न मोठ्या प्रमाणात खातात आणि हे सर्व पदार्थ प्रतिकारशक्ती वाढवते.

भारतीयांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक
देशात मृतांचा आकडा न वाढण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा असलेला अव्वल क्रमांक. इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनाच्या मृतांची संख्या वाढणार नाही. मात्र, असे जरी असले तरी हे सर्व सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉ. मेहरा यांनी सांगितले.

इटली, अमेरिकेसारखी मृतांची संख्या नसणार..
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच मृतांचे प्रमाणही इटली, स्पेन, अमेरिका यांसारख्या देशात कमी आहे. पण भारतीयांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने भारतात मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही, असेही नरिंदर मेहरा यांनी सांगितले.

Read Previous

गोरगरीबांसाठी सरकारची १.७० लाख कोटींची तरतूद

Read Next

कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट