कोरोना वॉरियर्सचा अपमान करू नका, रोहित पवार यांचे आवाहन

Smiley face < 1 min

ई ग्राम : आज राज्याला अशा नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, राज्यातील लोकांचा आणि कोरोना वॉरियर्सचा अपमान करू नका. असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ट्विटर वरून केले आहे.

भारतीय जनता पक्षांतर्फे आज महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या आवारातच काळ्या फिती लावून आणि सरकारला आवाहन करणारे फलक लावून आंदोलन करण्याचं आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे. यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले कि पण मास्क वापरण्याचा व अंतर ठेवण्याचा नियम वगळता हे सगळं नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणेच वाटलं.

वाचा:  मग सरकार काय करते; मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावर शरद पवार संतापले

याबरोबर आपल्या ट्विट मध्ये रोहित पवार म्हणाले कि राजकारण न करण्याचं अनेकदा आवाहन करुनही तुम्ही ते टाळूच शकत नाही का? एकतर लोकांच्या हक्कासाठी आणि कोणत्याही उत्स्फूर्त आंदोलनासाठी अशा लिखित मार्गदर्शनाची गरज नसतेच. पण तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे कपडे, रंग, मीडिया, घोषणा, अंतर असं सगळं कसं लिहून दिलं.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App