शेतकऱ्याचा जुगाड! सलाईनच्या बाटल्यांपासून बनवली ठिबक सिंचन प्रणाली

Smiley face 3 min

टीम ई ग्राम – मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात कमी पावसामुळे पडणाऱ्या दुष्काळामुळे बरेच शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाले आहेत. आपल्या कुटूंबाचे पालनपोषण हे शेतकरी रोजंदारीची कामे करतात. रमेश बारीया हा शेतकरीही यापैकीच एक. पण या शेतकऱ्याची कहाणी काही वेगळी आहे. तो शहरातून परत आपल्या गावात आला आणि त्याने आपल्या शेतीत एक नवीन प्रयोग केला.

झाबुआ जिल्ह्यातील रोतला गावचे रमेश बारिया यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणेच शेती करताना समस्या भेडसावत होत्या. जेव्हा शेतात काहीही पिकत नव्हते तेव्हा ते गुजरात आणि राजस्थानमध्ये रोजंदारीवर मजुरीची कामे करत होता. हा शेतकरी सांगते की, मला माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करायचे होते. परंतू माझ्या शेतात काहीच पिकत नव्हते. कुटुंबातील लोकांची उपासमार होवू नये म्हणून मला जे काही काम मिळेत ते मी करायचो.

पण बाहेर राज्यात जावूनही काही खास काम मिळत नसल्याने हा शेतकरी पुन्हा आपल्या गावी परत आला. रमेशच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याची हीच कहाणी आहे. परंतू रमेशने या समस्येवर मात करत तोडगा काढण्यासाठी कठोर परिश्रम केले. या शेतकऱ्याने आपल्या शेतात एक अद्वितीय ठिबक सिंचन प्रणाली तयार केली. ज्यामुळे त्याला कमी पाण्यात शेतीमध्ये चांगले उत्पन्न तर मिळालेच याशिवाय टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करून शेतीसाठी ठिबक सिंचन प्रणाली तयार केली.

एक वेळ अशी होती की, या शेतकऱ्याला आपल्या शेतीतून खआस काही उत्पन्न मिळत नव्हते. परंतू त्याने शेतात ठिबक प्रणाली वापरल्यानंतर पहिल्या वर्षात त्याने २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यानंतर, तो परिसरामध्ये शेतीतील प्रयोगाचे एक उदाहरण बनला. त्याच्या परिवर्तनाचा हा प्रवास झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्रासोबत सुरू झाला.

वाचा:  अखेर पीकविम्याचा प्रश्न सुटला; आज जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम

केव्हीके अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय कृषी नाविन्य उप प्रकल्प २०००९ मध्ये झाबुआ येथे सुरू करण्यात आला. कमी पाऊसमान असलेलेल्या ग्रामीण भागाचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने त्यांनी एकात्मिक शेती प्रणालीची सुरूवात केली. रमेश यांनी कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ०.१ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रात या योजनेत भाजीपाला लागवड करण्यास सुरवात केली. सन २०१२ मध्ये त्यांनी आपल्या जमिनीवर कारले आणि दोडक्याची पेरणी केली.

रमेश सांगतात की, त्यावेळी मला पपईचे शेतकरी बलराम पाटीदार यांच्या शेताला भेट देण्याची संधी मिळाली. त्याच्या शेतातील पीक हिरवेगार होते. त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही फळ तोडून चाचणी करू शकतो. उर्वरित शेतकरी नंतर केव्हीके मार्गदर्शकासह पुढील ठिकाणी गेले. पण मी तिथे एका आश्चर्यचकित होवून शेतात उभा राहिले. मला पाहून बलरामजींनी मला विचारले की मी गप्प का आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले. मग त्यांनी मला मातीच्या मडक्यांपासून बनविलेली त्यांची ठिबक सिंचन प्रणाली दाखवली. यानंतर कृषी शास्त्रज्ञांनीही मला फेकून दिलेल्या सलाईनच्या बाटल्या वापरुन ठिबक सिंचन प्रणाली तयार करण्यास प्रोत्साहन दिले.

वाचा:  ही विधयके म्हणजे शेतकऱ्यांचा 'मृत्युलेख'; काँग्रेसची टीका

त्यावेळी रमेश आपल्या शेतासाठी मोठ्या प्रमाणावर मातीची मडके विकत घेवू शकत नव्हते. म्हणून त्यांनी रुग्णालायात वापरलेल्या सलाईनच्या बाटल्यांमधून स्वतःची (SIY) ठिबक सिंचन व्यवस्था तयार केली. ते म्हणाले की, रुग्णालात ग्लूकोजची बाटली माणसाला मरणापासून वाचवू शकते, तर तीच बाटली माझ्या शेतातील मारणाऱ्या पिकाला का वाचवू शकत नाही?” ही कल्पना योग्य होती आणि म्हणून मी याचा शोध घेतला आणि ६ किलो सलाईनच्या बाटल्या २० रुपये प्रती किलोप्रमाणे खरेदी केल्या.

रमेशची ही पद्धत स्वस्त आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. परंतू ही व्यवस्था स्थापित करण्यासाठी आणि बाटल्यांमध्ये वेळेत पाणी भरणे यासाठी खूप मेहनत करावी लागणार होती. पण रमेश यासाठी पडेल ते कष्ट करायला तयार होता.

कशी तयार केली ठिबक सिंचन प्रणाली –

प्रथम पिकाच्या प्रत्येक झाडाजवळ लाकडी काठी रोवली. यानंतर ग्लूकोजच्या बाटलीचा तळाचा भाग कापून ही बाटली लाकडी खांबावर उलटी लटकवली. बाटलीचा तळाचा भाग वरच्या बाजूस ठेवला ज्याद्वारे बाटलीत पाणी भरता येते. बाटलीच्या तोंडावरील प्लास्टिकची नळी झाडाच्या मुळाजवळ असलेल्या जमिनीत लावली. यामुळे पाणी सरळ मुळांकडे जाते.
रमेशला यापुढे शेतात पिकांना थेट पाणी देण्याची गरज लागली नाही. त्यानंतर तो या बाटल्यांमध्ये पाणी ओततो आणि नळ्याच्या सहाय्याने पिकांच्या मुळांना पाणी मिळते. पाणी हळूहळू मुळांकडे जाते, म्हणून जमिनीतील ओलावा बराच काळ राहतो आणि पाण्याचा अजिबात अपव्ययही नाही.

वाचा:  क्युआर कोड स्कॅन करा अन् केळी खा बिनधास्त

या कामात रमेशचे संपूर्ण कुटुंब त्याला मदत करते. सकाळी सर्व बाटल्या पाण्याने भरल्या जातात. दोन ड्रम भरून पाणी विहीरीवरून आणतात आणि नंतर बाटल्यांमध्ये हे पाणी भरले जाते. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा या बाटल्यांमध्ये पाणी भरले जाते. अशा प्रकारे त्यांच्या पिकांना दररोज दोन लिटर पाणी मिळते. रमेशला यासाठी केवळ ५०० रुपये खर्च आला आणि काही महिन्यातच त्याला यापासून २५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.

आयसीएआरच्या अहवालानुसार रमेशसारख्या शेतक्यांना अशा यंत्रणेद्वारे एका हंगामात प्रति हेक्टर दीड लाख ते पावणे दोन लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. रमेशच्या मदतीने आणि मार्गदर्शनामुळे परिसरातील अन्य शेतकरी या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे जिल्हा प्रशासन आणि कृषी मंत्रालय, मध्य प्रदेश सरकार यांनीही कौतुक केले आहे आणि त्यांना दहा हजार रुपये प्रोत्साहनपर पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर केव्हीकेच्या मदतीने येत्या काही वर्षांत त्यांच्या शेतात मोफत ठिबक सिंचन यंत्रणा बसविण्यात आली.

एक वेळ अशी होती की, माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. दिवसाला ५ रूपयेही मिळकत नव्हती. पण आता मी शेतीतून वर्षाला २ लाख रूपये मिळवतो. मला तीन मुले आणि एक मुलगी आहे. मी खूप आनंदी आहे कारण आता मी त्यांना चांगले भविष्य देऊ शकू, असे रमेश म्हणाला.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App