पावसामुळे डाळींब, सीताफळाची आवक घटली; बाजारात मंदी कायम

Smiley face < 1 min

मुंबई – सध्याच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील कृषीक्षेत्राला बसत आहे. डाळींब आणि सीताफळाचा हंगाम तेजीत असताना या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे डाळिंबावर काळे डाग पडून फळं खराब होऊ लागली आहेत. तर सीताफळेही गळून पडू लागली आहेत. त्यामुळे बाजारातील डाळींब आणि सिताफळाची आवक घटली आहे.

डाळींब वर्षभर मिळत असले, तरी पावसाळ्यात त्यांचे उत्पादन अधिक चांगले असते. रोपांना चांगले पाणी मिळत असल्याने अगदी रसदार आणि टपोऱ्या दाण्याच्या डाळिंबाचे या काळात पाहायला आणि खायला मिळतात. या काळात त्याचे दरही कमी असतात. मात्र, आता सलग पडणाऱ्या पावसाने मध्येच विश्रांती घेत पुन्हा हजेरी लावायला सुरुवात केली. त्यामुळे शेतात तयार झालेल्या डाळिंबावर पावसामुळे काळे डाग पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे फळं खराब होत आहेत. डाग लागलेली फळे खरेदी करण्यास कुणी तयार होत नाही.

वाचा:  मोदी सरकारला धोरण लकवा झालायं; काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन

आता बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात जेजुरी, नगर, सांगोला, सासवड येथून डाळिंबाची आवक होत असते. आता सासवडवरुन आवक सुरु आहे. ही आवक मागच्या महिन्यापेक्षा कमी आहे. ५० ते १०० रुपये किलो असणारे डाळिंबाचे दर घाऊक बाजारात ५० ते १५० रुपये किलोवर गेले आहेत.

हीच परिस्थिती सीताफळाच्या बाबतीतही आहे. घाऊक बाजारात सध्या सासवड, शिरुरमधून सीताफळांची आवक होत आहे. त्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. आकारानुसार सीताफळ ४० ते १०० रुपये किलो घाऊक बाजारात आहेत. त्यातही आकाराने मोठे असलेल्या गोल्डन सीताफळाची आवक अजून सुरु झालेली नाही. त्यामुळे सीताफळाचा हा हंगाम मंदीतच असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

वाचा:  राज्यात येत्या दोन दिवसात मुसळधार; हवामान खात्याचा अंदाज

आधीच बाजारात खरेदीदार कमी आहेत. आता आवकही कमी होत आहे. आधीच कमी असणाऱ्या ग्राहकांची मागणी पूर्ण करता येईल, इतका मालाही बाजारात येत नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी चांगली फळे लागली असून चांगला माल बाजारात पाठवता येईल, असे निरोप अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना पाठवले होते. मात्र, मध्येच आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट कायम असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

वाचा:  या उपक्रमामुळे 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला फायदा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App