उद्योगपतींनी किमान एक प्रकल्प आणावा ; नव्या प्रकल्पांना तातडीने मंजुरी – मुख्यमंत्री

Smiley face < 1 min
उद्धव ठाकरे (फाईल फोटो)

ई ग्राम : महाराष्ट्रात उत्पादन सुरु व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून उद्योगपतींनी त्यांच्या मनातील किमान एक तरी आमच्याकडे घेऊन यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना केले. नव्या प्रकल्पांना तातडीने मंजुरी देण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उद्योगपतींशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने हा संवाद आयोजित केला होता. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

egram

कोरोनाच्या वातावरणातही उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावीशी वाटते आहे हे फार महत्वाचे आहे. अशा सर्व उद्योग आणि गुंतवणूकदारांचे आम्ही स्वागतच करु. महाराष्ट्र हे आपले घरच आहे. आपल्या देशाच्यादृष्टीने ‘मेड इन इंडिया’ तर आहेच पण महाराष्ट्राचे देखील एक वैशिष्ट्य असावे. एखादी वस्तू, उत्पादन हे ‘मेड इन महाराष्ट्र’ असावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

जिथे शक्य आहे तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ही कार्यपद्धती आपल्याला कायमस्वरूपी अवलंबता येईल. जेणे करून कोरोना नंतरच्या काळातले आपले जीवन सुरक्षित आणि व्यवस्थित राहील हेही आपल्याला पहावे लागेल. मुंबईत 50 टक्के लोक झोपड्यांत राहतात. धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनामुळे काय हाहाकार माजेल असे वाटले होते, पण आम्ही खूप प्रयत्न केले आणि संसर्ग रोखला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कामही आमच्या प्राधान्यक्रमात आहे, असे ठाकरे यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

येणाऱ्या काळात ऑनलाईन व्यवहारांचे आणि एकूणच दूरसंचारला येणारे महत्व लक्षात घेता राज्यात सर्वदूर दर्जेदार आणि गतिमान नेटवर्कचे जाळे उभारण्यात येईल. सध्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना  काही अडचणी असतील तर त्या दूर करणे तसेच या क्षेत्रांची परिस्थिती चांगली करण्यावर भर दिला जाईल, असे ठाकरे म्हणाले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App