सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात बांबू फोरमची स्थापना

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील इंडिया बांबू फोरमची स्थापना करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारतच्या उभारणीत बांबू पिकाचा मोठा सहभाग असणार आहे. माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू याच्या नेतृत्वात या बांबू फोरमची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांबू या विषयात पुढाकार घेतला असून त्यांना नितिन गडकरी आणि सुरेश प्रभू यांची साथ मिळाली आहे.

वाचा:  ‘वेळेत पीक कर्ज फेडणाऱ्यांना परतावा’

देशाच्या विकासाच्या चळवळीचा बांबू हा महत्वाचा पाया ठरणार आहे. बांबूच्या लागवडीमुळे जंगलतोड कमी होण्यास मदत होणार असून पर्यावरणाची हानीही टाळता येणार आहे. बांबू पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार असून रोजगार निर्मिती करणेही शक्य होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांना जोडून तंत्रज्ञानाचे आदान प्रदान केले जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला चांगले दिवस येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू सोबतच काजू, आंबा यासारख्या फळझाडांची लागवड केली जाते. बांबूसाठी विशेष मेहनत घेण्याची गरज नसते. मात्र, बांबूतून हमखास उत्पन्नाची हमी असते. याचाच फायदा जिल्ह्यातील बांबू उत्पादकांना होणार आहे.

वाचा:  नुकसानग्रस्तांसाठी मिळाले ‘इतके’ कोटी रुपये

मागील २० वर्षांपासून देशातील बांबू क्षेत्र विकसीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता पंतप्रधान मोदी यांनी खऱ्या अर्थाने याला गती देण्याचे काम केले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे देखील बांबू क्षेत्राच्या वाढीसाठी आग्रही आहेत. त्यांनी बांबूपासून इथेनॉल, शेडनेट आणि फर्निचर तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू रिसर्च सेंटरची १०० कोटी रुपये खर्चून बांबूपासून इमारत निर्माण करण्यात आली आहे. आजपर्यंत या क्षेत्राची ताकद पुर्णपणे वापरता आली नाही. यामाध्यमातून या क्षेत्रात काम करण्याऱ्या घटकांना जोडले जाणार आहे. फोरमचा ऑनलाईन उद्घाटनाचा शुभारंभ नवी दिल्लीत करण्यात आला.

वाचा:  केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे - हंसराज अहीर

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App