सांगली : निम्मा पावसाळा संपला तरी प्रकल्पांत फक्त ३३ टक्के पाणीसाठा

Smiley face 2 min
सांगली : निम्मा पावसाळा संपला तरी प्रकल्पांत फक्त ३३ टक्के पाणीसाठा

सांगली – जिल्ह्यात मान्सूनची दमदार सुरवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली आहे. मध्यम आणि लघु अशा ८४ प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ९४४० दश लक्ष घन फूट असून त्यास सध्या ३०९१ दशलक्षम घनफूट म्हणजे जवळपास ३३ टक्के इतका पाणीसाठा आहे. परंतू जत तालुक्यातील २८ प्रकल्पात अवघा ७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

गेल्या वर्षी जून आणि जुलै महिन्याअखेर अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा अवघा १० टक्के इतका होता. त्यामुळे ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. दरम्यान, जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. तसेच दुष्काळी पट्ट्यात परतीच्या पावसाने झोडपले. त्यामुळे मध्यम आणि लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासली नाही.

यंदा मात्र जिल्ह्यात मॉन्सूनची दमदार सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व भागात पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे मध्यम आणि लघू प्रकल्पातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. परंतू दुष्काळी पट्ट्यात अपेक्षित उन्हाळी पाऊस झाला नाही. त्यामुळे तलावातील पाणी उपसा करावा लागला. त्यातून शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

वास्तविक पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिड महिन्यातच पावसाने सरासरी गाठली आहे. परंतू या पावसाने मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. तासगाव, खानापूर, या भागातील बहूतांश तलाव पाण्याने भरले आहेत. मात्र, जत तालुक्यातील तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. जत तालुक्यातील ८ तलाव कोरडे आहेत. तर जिल्ह्यातील ४२ तलावांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा पाणीसाठा कमी आहे.

ऐन पावसाळ्यात शेतकरी चिंतेत

ऐन पावसाळ्यात पाणीसाठा कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यातील खरीपाच्या ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. सध्या ८४ प्रकल्पात ३०९१ दश लक्ष घन फूट इतका पाणीसाठा आहे. जर वेळेत पाऊस झाला नाही तर पाणी साठा संपण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

तालुका तलाव संख्या पाणीसाठा
तासगाव ४७ टक्के
खानापूर ५७ टक्के
कडेगाव ३४ टक्के
शिराळा ७३ टक्के
जत २८७ टक्के
कवठेमहांकाळ ११३७ टक्के
मिरज १४ टक्के

जिल्ह्यातील १ जून ते १६ जुलै अखेर झालेला पाऊस (मिमीमध्ये)

तालुका सन २०१९सन २०२०
मिरज १८० १९४.२
जत ११९.१ १२४.३
खानापूर १०९.१ ३०९
वाळवा २३७.७ २१७.३
तासगाव १८४.४ २००.७
शिराळा ४४७.५ ४६९.८
आटपाडी ११५ १८०.३
कवठेमहांकाळ ११८.५ २७१.२
पलूस १५३.६ १७० .३
कडेगाव १७२.८ २१०.८

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App