25 रुपये दराने दूध खरेदी योजनेला मुदतवाढ द्या, खासदार निंबाळकर यांची मागणी

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 25 रुपये दराने दूध खरेदी करण्याबाबतच्या योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसे पत्र त्यानी श्री. ठाकरे यांना मेलद्वारे पाठविले आहे.

पत्रानुसार, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील दुधाच्या व दुग्धजन्य पदार्थाच्या मागणीत मोठया प्रमाणात घट झाली.तसेच दुधउत्पादक शेतकऱ्यांच्या दुधास योग्य भाव मिळत नसल्याने शासनाने दूधउत्पादक शेतकऱ्यांकडून 25 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करण्याबाबतची योजना 27 एप्रिल रोजीच्या शासननिर्णयान्वये कार्यान्वित केली. मात्र योजनेचा कालावधी 31 मेपर्यंत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीच्या काळात देखील दूध उत्पादक शेतकरी पशुपालन करीत आहेत, परंतू त्यांच्या दूधाला व योग्य भाव मिळत नाही. तसेच खाजगी दूध संकलन करणाऱ्या संस्था कमी भावाने दूध खरेदी करतात.

वाचा:  अखेर ते पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत ! महाविकास आघाडीतला वाद मिटणार ?

25 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदीची योजना शासनाने बंद केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग संपुष्ठात येईपर्यंत शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 25 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करण्याबाबतची योजना कार्यान्वित करावी, या योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील दूध उत्पादक शेतकऱ्याकडून शासनामार्फत प्रतिदिन दहा हजार लिटर दुधाची स्विकृती करण्यात येते.जिल्हयात मोठया प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी असल्याने प्रतिदिन 20 हजार लिटर दुध स्विकृती करुन जिल्हयासह राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. अशी मागणी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेनिंबाळकर यांची ईमेलव्दारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

वाचा:  तुम्ही या सरकारचे 'हेड मास्टर' आहात की 'रिमोट कंट्रोल'? संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App