पुढील ५ दिवस असणार अस्मानी संकट, ‘या’ भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

Smiley face < 1 min

पुणे – राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. अशात आजपासून (ता. १५) राज्यात आसमानी संकट असणार आहे. येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडही कोसळू शकतात अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

वाचा:  कांदा निर्यातबंदीचा दरावर परिणाम नाही; क्विंटलला झाली 'एवढी' वाढ

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगष्टमध्ये माञ जोरदार हजेरी लावली आहे.

गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

वाचा:  अखेर पीकविम्याचा प्रश्न सुटला; आज जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम

पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सून सर्वदूर पोहचला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App