कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

ई ग्राम : देशभरात चालू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सोलापूर, नगर ,औरंगाबाद ,धुळे जिल्ह्यातील काही खाजगी दूध संघांनी दुधाचे दर निम्म्यावर आणले आहेत याचे कारण दूध उपपदार्थ निर्मिती कमी झाली मागणी कमी आहे असे सांगितले जात आहे. खरतर दूध हे पूर्णान्न आणि त्याचा दैनंदिन आहारात म्हणजे अश्या आणीबाणीच्या स्थितीत जास्तीत जास्त वापर व्हायला हवा… तरच उत्तम रोगप्रतिकार शक्ती समाजात कायम राहील.

सध्या ह्या लॉक डाऊन चा मोठा फटका दूध उत्पादक शेतकर्यांना थेट बसला आहे ज्यामुळे चढ्या दराने खरेदी केलेल्या गायी म्हैशी, यंत्रसामुग्री, चारा पाणी,मजुरी ह्या वाढीव खर्चाचा मिळणाऱ्या दाराशी ताळमेळ बसवणं मुश्किल होणार आहे. काही संकलन करणाऱ्या डेर्या फक्त सोशल मीडिया वरील अफवांमुळे दर कमी करीत आहेत असं ही निदर्शनास येतंय. शेतकर्यांना अश्या वेळी एकजूट राहून थेट संघांशी दरांविषयी निश्चिती करून घ्यावी

मुळात शहरांत दूध भाजीपाला वाण समान चढ्या दराने विकलं जात आहे आणि ते घेण्यासाठी लोकं जीवाची पर्वा न करता किंवा पोलिसांचा मार खाऊन सुद्धा खरेदी करायला रस्त्यांवर बाजारात गर्दी करतायत…आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या हातावर मात्र तुरी ठेवल्या जात आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दूधासारखीच परिस्थिती इतर शेतमालाची सुद्धा आहे.

-प्रीतम नलावडे.

Read Previous

घाबरू नका! भारतात इटली, अमेरिकेसारखी मृतांची संख्या नसणार; कारण…

Read Next

आरोग्य सहाय्यीकेला पोलिसांकडून बेदम मारहाण