शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करावी; रणजितसिंह मोहिते पाटील यांची मागणी

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडील संपूर्ण मका हमीभावाने खरेदी करावी आणि तातडीने बंद केलेली मका खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे ही मागणी आमदार मोहिते पाटील यांनी केली आहे. राज्यासाठी केंद्र सरकारने दिलेला अडीच लाख टनाचा कोटा खूपच कमी आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्यालाही तो अगदीच कमी ८ हजार क्विंटलपर्यंत आहे.

egram

परंतु, जिल्ह्यातील एकूण मका उत्पादन आणि दिलेला कोटा, याचा विचार करता हा अत्यंत कमी आणि त्रोटक आहे. त्यातच आता कोटा संपल्याने मका खरेदी बंद केली आहे. एकट्या माळशिरस तालुक्यातच जवळपास ३० हजार क्विंटलहून अधिक मका शिल्लक आहे. मका खरेदी केंद्रे बंद केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

सध्या बाजारात मक्याचे दर पडले आहेत. १३०० ते १४०० रुपयांपर्यंतच हे दर आहेत. तर हमीभाव केंद्रावर हाच दर १७५० रुपये आहे. खरेदी केंद्र बंदचा फायदा खासगी खरेदीदर घेत, दर पाडण्याची भीती आहे. त्यामुळे वरिष्ठस्तरावरून याबाबत आदेश व्हावा, असेही या निवेदनात आमदार मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App