‘शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन गारपीट, वादळाबाबत विमा हप्ते भरावेत’

Smiley face < 1 min

जळगाव : पंतप्रधान हवामान आधारित फळपीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून, त्यात गारपीट या हवामान धोक्यापासून केंद्र शासनाने संरक्षण दिलेले नाही. यामुळे केंद्राच्या पोर्टलवर गारपीट व वादळ याबाबत विमा संरक्षण घेण्यासाठी किंवा त्याचा स्वतंत्र हप्ता भरण्यासाठी पर्याय (ऑप्शन) नाही, पण शेतकऱ्यांना गारपीट व वादळ याबाबत विमा संरक्षण घेण्यासाठी बँकेत विमा हप्ता भरता येतो, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

वाचा:  ‘केंद्र सरकार कॉर्पोरेटच्या मर्जीवर चालणारे’

या बाबत कृषी विभागातील मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्याने स्वतःच्या अनुदानातून गारपीट या हवामान धोक्याचा समावेश फळपीक विमा योजनेत केला आहे.

egram

दरम्यान, ‘पीएमएफबीवाय’ हे केंद्र शासनाचे पोर्टल असून, त्यावर ऑनलाइन विमा हप्ता भरला जातो. मात्र गारपीट, वादळ हा हवामान धोका केंद्र शासनाच्या योजनेत नसल्याने त्यासाठीचा विमा हप्ता पोर्टलवर स्वीकारला जात नाही. मात्र बिगर कर्जदार शेतकरी तापमानबाबत पोर्टलवर विमा हप्ता भरून त्याच्या पावतीसह बँकेत जाऊन गारपीट, वादळ याबाबत विमा हप्ता भरू शकतो. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहतो, असे म्हणता येणार नाही.

वाचा:  दीदींची आणि मुख्यमंत्री ठाकरेंची भेट होऊ शकणार नाही; जाणून घ्या नेमकं कारण...
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App