“शेतकऱ्यांनी जनवरांचे लाळ्या-खुरकूत, लंम्पी स्कीनचे लसीकरण करून घ्यावे”

Smiley face < 1 min

नगर : संगमनेर तालुक्यात लाळ्या-खुरकूत आणि लंम्पी स्कीन या आजारांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन ‘महानंद’ व संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले.

संगमनेरमधील राजहंस दूध संघ व पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने लाळ्या-खरकूत व लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोजित आढावा बैठक झाली. यावेळी देशमुख बोलत होते.

egram
वाचा:  द्राक्ष बागांना वातावरण बदलाचा फटका

यावेळी देशमुख म्हणाले, संगमनेर तालुक्यातील दुग्धव्यवसाय व्यापक स्वरूपाचा आहे. मात्र, त्या प्रमाणात शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने व पशुवैद्यकांची संख्या कमी आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे रिक्त पदे भरण्याची विनंती केली आहे. राजहंस दूध संघाच्या माध्यमातून सुरू केलेल्या राजहंस मेडिकलमध्ये स्वस्त दरात औषधे उपलब्ध केलेली आहेत.

लाळ खरकुत व लंम्पी स्किन डेसिज हे संसर्गजन्य आजार असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराची लक्षणे दिसताच जवळच्या सरकारी पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे किंवा राजहंस दूध संघाच्या स्वयंरोजगार केंद्र अधिकारी यांच्याकडे संपर्क करून तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावे.

वाचा:  अन्न प्रक्रिया उद्योगांकडे गुंतवणूकदारांची पाठ; केंद्राची संसदेत माहिती

राजहंस दूध संघाच्या माध्यमातून सुरू केलेल्या राजहंस मेडिकल मध्ये स्वस्त दरात औषधे उपलब्ध केलेली आहेत. दुधावरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचा दूध संघाचा तो प्रयत्न दूध उत्पादकांना योग्य वेळी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जनावरांचे आजार व उपचाराबाबत डॉ. प्रशांत पोखरकर व डॉ. सुजित खिलारी यांनी मार्गदर्शन केले. दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, संपतराव डोंगरे, डॉ. संतोष वाकचौरे, डॉ. अजय थोरात, डॉ. जालिंदर तिटमे, डॉ. संजय थोरात, डॉ. वर्षा शिंदे, डॉ. प्रमोद पावसे कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षक, तसेच दूध संघाचे स्वयंरोजगार केंद्र अधिकारी उपस्थित होते.

वाचा:  संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर होणाऱ्या टिकेला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App