शिरूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

Smiley face < 1 min
शिरूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

पुणे – शिरूर तालुक्यात जून महिन्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली होती. याच पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी बाजरी, मूग या पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप पिकांची पेरणी केली आहे. याट पावसाच्या ओलीवर आतापर्यंत ही पिके टिकून आहेत. चालू महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिल्याने पिके जळून जाण्याची भीती असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे.

वाचा:  पुढील ५ दिवस असणार अस्मानी संकट, 'या' भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

सध्या चासकमानचे पाणी उपलब्ध असले तरी पावसावर अवलंबून असणारी पिके मात्र जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. सध्या ऐन हंगामात पिके जोमात आहेत. परंतू आठवडाभरात पाऊस पडला नाही तर हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

तालुक्यातील विविध भागात बाजरी आणि मुगाचे पीक जोमात आहे. परंतू पाऊस नसल्याने हुमणी अळीने पिकांना चांगलेच घेरले आहे. हुमणी अळीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट होणार असल्याचे तळेगाव ढमढेरे येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब ढमढेरे, प्रदीप जेधे, संजय भुजबळ, राजेंद्र केदारी, निवृत्ती जकाते, मधुकर भूमकर यांनी सांगितले. मात्र, सध्या तरी खरीप पिकासाठी शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

वाचा:  पुढील ५ दिवस असणार अस्मानी संकट, 'या' भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App