ठाकरे सरकारमधील पहिली विकेट; अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला

Smiley face < 1 min

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे. दिवसेंदिवस त्यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढला होता. आज अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा दिला आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा मंजूर केला आहे.

राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.

egram

आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राठोड यांच्या राजीनाम्याबाबत सूचक ट्विट केलं आहे. यामुळे आज सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात मोठी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

दरम्यान, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App