उडदाचे दर हमीभावावर टिकून; जाणून घ्या नवे बाजारभाव

Smiley face 2 min

पुणे : नवीन हंगामातील मूग आणि उडदाची बाजारात आवक होत आहे. मुगाची आवक वाढत असून, गेल्या आठवड्यात दर काही ठिकाणी हमीभावाच्या खाली आहेत. तर उडदाचे दर मात्र हमीभावापेक्षा अधिक होते.

गेल्या काही दिवसांत मूग आणि उडदाची आवक बाजार समित्यांमध्ये वाढत आहे. मुगाची आवक महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यात वाढली त्यामुळे दर काही प्रमाणात नरमले आहेत. यंदा केंद्र सरकारने मुगाला ७२७५ रुपये, तर उडदाला ६३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मूग दरात ५० ते १५० रुपयांची घसरण झाली होती.

egram

लातूर बाजार समितीत मुगाला सरासरी ६६०० ते ६६५० रुपये, अकोला बाजार समितीत ७०५० ते ७५५० रुपये सरासरी दर मिळाला. तर गेल्या आठवड्यात कर्नाटकात मूग दर टिकून होते, तर उडीद दरात १०० रुपयांची सुधारणा झाली होती. बीदर बाजारात मुगाला सरासरी ६००० ते ७००, गदग बाजारात ६२५३ ते ६९८९ आणि हुबळी बाजारात ६०६२ ते ६८६० रुपये दर मिळाला. तर उडदाचे दर ६५०० ते ७४०० रुपये दर मिळाला.

वाचा:  एमएसपीचा कायदा करा अन्यथा प्रजासत्ताक दिनी आंदोलन - राकेश टिकैत

मध्य प्रदेशात मुग दरात ५० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात मुगाला सरासरी ५८०० ते ६६७० रुपये दर मिळाला. येथे मुगाला मागणी कायम होती. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाली होती. राजस्थानातही नव्या मुगाला मागणी कायम होती.

मागणी सामान्य असल्याने दरात जास्त चढ-उतार पाहायला मिळाले नाही. जयपूर बाजारात मुगाला सरासरी ६५०० ते ७१०० रुपये दर मिळाले. तर नागौर येथे ६००० ते ६७०० रुपये आणि किशनगढ बाजारात ४५०० ते ६५०० रुपये आणि केकडी बाजार समितीत सरासरी ६२०० ते ७००० रुपये दर मिळाला. तर जयपूर उडदाला मागणी वाढल्याने दरात २०० रुपयांपर्यंत दरात सुधारणा झाली होती. जयपूर उडदाला सरासरी ६६०० ते ७६०० रुपये दर मिळाला. तर केकडी उडदाला ५५०० ते ७००० रुपये सरासरी दर मिळाला.

वाचा:  राज्याच्या ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

ललीतपूर बाजार समितीत मुगाच्या मागणीत फार वाढ किंवा घट झाली नाही त्यामुळे दरातही फार बदल पाहायला मिळाले नाहीत. यंदा मुगाला सरासरी ६००० ते ६५०० रुपये दर मिळाला. तर राजकोट बाजार समितीत मुगाच्या दरात १०० रुपयांपर्यंत घसरण झाली होती. तर मुगाला सरासरी ६००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर विजयवाडा येथे उडदाच्या दरात १०० रुपये सुधारणा झाली होती. गेल्या आठवड्यात ७७०० ते ७९०० रुपये दर मिळाला होता. तर बरेली उडदातही १०० रुपये सुधारणा होऊन सरासरी ७२०० रुपये दर होता.

वाचा:  चुकीच्या लॉगिन आयडीला गावांची जोडणी केल्याने महाडीबीटीच्या कामात अडथळा

राज्यातही उडीद खातोय भाव
उडदाला मागणी टिकून असल्याने अकोला बाजार समितीत गेल्या आठवड्यात उडदात १०० रुपये, बार्शीत २०० रुपये, दुधनी येथे १०० आणि जळगाव येथे २०० रुपये सुधारणा झाली होती. अकोला बाजार समितीत सरासरी ६००० ते ७४०० रुपये, बार्शीत ३५०० ते ७२०० रुपये, दुधनी बाजार समितीत ६५०० ते ७४०० रुपये आणि जळगाव बाजार समितीत ६००० ते ७७०० रुपये सरासरी दर मिळाला.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App