नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजी; जाणून घ्या बाजारभाव

Smiley face < 1 min

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक दिवसाला साधारण ८०० क्विंटल होती. गेल्या आठवडाभरात फ्लॉवर, दोडक्याच्या आवकेत व दरात तेजी राहिली. तर, भुसार मालाची आवक आणि दर स्थिर असल्याचे पहायला मिळाले.

नगर येथील बाजार समितीत अलीकडच्या काळात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. आठवड्यात टोमॅटोची १४५ आवक होऊन प्रतिक्‍विंटल ८०० ते ९०० असा दर मिळाला. वांग्यांची दहा क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते अडीच हजार, फ्लॉवरची दर दिवसाला ५० क्विंटलची आवक होऊन पाच हजार ते सहा हजार रुपये, कोबीची आठ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ६०० रुपये, काकडीची ४० क्विंटल आवक होऊन १५०० ते २००० रुपये, दोडक्याची १० क्विंटल आवक होऊन ४००० ते साडेचार हजार, कारल्याची ४० क्विंटल आवक होऊन दीड हजार ते दोन हजार, भेंडीची ४० क्विंटल आवक होऊन २००० ते ३०००, घेवड्याची आठ क्विंटल आवक होऊन तीन हजार ते साडेतीन हजार रुपयाचा दर मिळाला.

egram
वाचा:  सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला

बटाट्याची १०० क्विंटल आवक होऊन ८०० ते १३०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक होऊन १००० ते दोन हजार, तर सिमला मिरचीची ४० क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५०० रुपयाचा दर मिळाला.

दरम्यान, लसणाची दर दिवसाला आठ ते दहा क्विंटलची आवक होत आहे. सहा हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळत आहे. वाटाण्याची १७ ते २० क्विंटलची आवक होत आहे. दर आठ ते दहा हजार रुपये मिळत आहे.

वाचा:  साहित्य संमेलनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत; ट्विट करत सांगितले कारण

मुगाला ५५०० ते ७१०० रुपये
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार जावक आणि दर स्थिर राहिले. सध्या ज्वारी बाजरी मूग उडीद हरभरा तूर गहू सोयाबीन मालाची आवक होत आहे. सर्वाधिक आवक मूग, उडदाची होत आहे. मुगाला ५५०० ते ७१०० दर मिळत आहे, तर उडदाला ५८०० ते ६४०० रुपयांचा दर मिळत आहे.

वाचा:  “एमएसपीविषयक समितीचे स्वरूप स्पष्ट करा”
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App