आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना चार महिन्याचा वाढीव पगार

ई-ग्राम । कोरोना विषाणूचा देशभरात वेगाने फैलाव होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आजवर देशात ११ करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले आहेत. राजधानी दिल्लीत दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूत देखील एक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा हा ५६२वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असून ही संख्या १२२ एव्हडी आहे. तसेच रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांची अवस्था गंभीर आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचं काम आहे. याची पूरेपूर जाणीव असल्यानेच ओडिशातील नवीन पटनाईक सरकारने आरोग्यविभागाच्या कर्माचाऱ्यांना ४ महिन्यांचा अॅडव्हान्स पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर करोनाच्या वाढत्या संकटाचा अंदाज घेऊन ओडिशा सरकारने आपले अनेक जिल्हे यापूर्वीच लॉकडाऊन केले होते. त्यानंतर मंगळवारी मध्य रात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

Read Previous

पाकिस्तानला अतिशहाणपणा नडला; रुग्णांची संख्या पोहोचली…

Read Next

कोरोनाला रोखण्यासाठी अशी घ्या काळजी – पोलीस अधिकारी