इंधन दरवाढीमुळे शेतीचे गणित बिघडले; मशागतीचे दर वाढले, शेतकरी पुन्हा अडचणीत

Smiley face < 1 min

नागपूर : पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातून शेतकरीसुद्धा सुटला नाही. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे, ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नाला मिळणारे बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती सध्या तोट्यात जात आहे.

पूर्वी शेतकरी शेती मशागत बैलाच्या सहाय्याने करत असत. बैलाच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी अशा प्रकारची सर्व कामे करताना शेतकऱ्याला कुठलाही खर्च येत नव्हता. कालांतराने आधुनिक काळात बैलांची जागा ही हळूहळू ट्रॅक्टरने घेतली.

egram
वाचा:  राज्यात मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता

‘घंटो का काम मिनिटो मे’ होत असल्याने शेती मशागतीला यांत्रिकीरणाची जोड मिळाली आहे. ट्रॅक्टरमुळे शेतीच्या कामांनाही वेग आल्याने शेतीकरिता ट्रॅक्टर महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे शेतातील बहुतांश कामे ही सध्या ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे शेतीची मशागत आता परवडणारी नसली तरी काळानुरूप लाखांच्या घरात गेलेल्या बैलजोड्या ठेवणे सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही.

वाचा:  कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतकरी आता चिंतेत सापडला आहे. सध्या शिवारात शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. परंतु शेतीची मशागतच करणे शेतकऱ्यांना महागात पडत असल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

वाचा:  राज्यातील शाळांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाल्या...

बैलजोडीही महागली
पूर्वी शेतीची कामे ही बैलांच्या मदतीने केली जात होती. आता ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या मदतीने होत आहेत. परंतु इंधनाचे दर हे दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने अशी महागडी शेती करणे, शेतकऱ्यांना परवडणारी नाही. सध्या बैलजोडीचा भावही आवाक्याबाहेर गेल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App