वायदा-बाजार अपडेट २९ जून २०२० : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार

Smiley face < 1 min

ॲग्रोवन ई ग्राम : आज सोयाबीन, चणा आणि हळदीच्या वायद्यात वाढ झाली आहे. देशातील सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजारभाव खालील चार्टप्रमाणे ( वेळ : दुपारी ५:४४) : सोयाबीन : सोयाबीनच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या वायद्यात आज मोठी घट पाहायला भेटली असून अनुक्रमे ३८, ५० आणि ३६ रुपयाची घट सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाहायला भेटली. सोयाबीनचे इंदोर मार्केटमधील बाजारभाव ०.५१% ची घट होऊन सोयाबीनचे हजर बाजारातील भाव ३६८० रुपयापर्यंत पोचले आहेत. इंदोर मार्केटसह महाराष्ट्रातील लातूर, अकोला, वाशीम मार्केटमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये ४० ते ५० रुपयांची घट झाली आहे.

वाचा:  पुणे लॉकडाऊन मध्ये बाजार समितीसह उपबाजार बंद राहणार

हळद : जुलै महिन्याच्या वायदा ५७०६ रुपयावर पोचला असून यात १२६ रुपयाची घट झाली आहे तर ऑगस्ट महिन्याच्या वायद्यात ११४ रुपयाची घट झालेली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हळदीचा वायदे अनुक्रमे ५७०६ आणि ५७४६ रुपयांवर गेला आहे. निझामाबादमधील हळदीच्या हजर बाजारात आज ०.५३% टक्क्याची घट होऊन हळदीचे भाव क्विंटल मागे ५५५१ रुपयावर पोचले आहेत.

वाचा:  मागील २४ तासात कोरोनाच्या २६५०६ नव्या रुग्णांची विक्रमी वाढ; देशभरात ७९३८०२ रुग्ण

चणा : चण्याच्या वायदे बाजारात अनुक्रमे १२७ आणि १२३ रुपयांची घट झालेली असून चण्याचे वायदे ४१६७ आणि ४२०२ रुपयांवर पोचले आहेत. चण्याच्या दिल्लीच्या हजरबाजारात १.१६ टक्क्याची घट होऊन ४२५० रुपये प्रतिक्विंटवर पोचले आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App