वायदा-बाजार अपडेट १ जुलै २०२० : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

Smiley face < 1 min

ई-ग्राम : आज सोयाबीन, हळदीच्या वायद्यात वाढ झाली आहे तर चण्याच्या वायद्यात घट झाली आहे. देशातील सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजारभाव खालील चार्टप्रमाणे ( वेळ : दुपारी ५:४४) : सोयाबीन : सोयाबीनच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या वायद्यात आज मोठी वाढ पाहायला भेटली असून अनुक्रमे ४०, ४६ आणि ३६ रुपयाची वाढ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाहायला भेटली. सोयाबीनचे इंदोर मार्केटमधील बाजारभाव ०.४४% ची वाढ होऊन सोयाबीनचे हजर बाजारातील भाव ३६९४ रुपयापर्यंत पोचले आहेत.

वाचा:  बाजारभाव अपडेट-१२ ऑगस्ट २०२०: जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

हळद : जुलै महिन्याच्या वायदा ५७४६ रुपयावर पोचला असून यात ६ रुपयाची घट झाली आहे तर ऑगस्ट महिन्याच्या वायद्यात ८ रुपयांची घट झालेली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हळदीचा वायदे अनुक्रमे ५७४६ आणि ५७७६ रुपयांवर गेला आहे. निझामाबादमधील हळदीच्या हजर बाजारात आज ०.०२% टक्क्याची घट होऊन हळदीचे भाव क्विंटल मागे ५५५० रुपयावर पोचले आहेत.

वाचा:  वायदा बाजार अपडेट १२ ऑगस्ट २०२०: सोयाबीन, हळद, आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

चणा : चण्याच्या वायदे बाजारात अनुक्रमे ५ आणि ७रुपयांची घट झालेली असून चण्याचे वायदे ४१९९ आणि ४२६३ रुपयांवर पोचले आहेत. चण्याच्या दिल्लीच्या हजरबाजारात ०.३३ टक्क्याची वाढ होऊन ४२६३ रुपये प्रति क्विंटल पोचले आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App