वायदा बाजार अपडेट २९ जुलै २०२०: सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

Smiley face < 1 min

ई ग्राम : आज देशातील वायदे बाजार मध्ये सोयाबीन, चणा आणि हळदीच्या वायद्यात वाढ झाली आहे. सोयाबीन – सोयाबीनचा ऑगस्ट महिन्यातील वायदा १२ रुपयांनी वाढला आहे. ऑगस्टमधील वायद्याचा भाव ३ हजार ७७४ इतका आहे. तर, सप्टेंबरच्या वायद्यात १४ रुपयांची वाढ आली असून भाव ३ हजार ७५४ इतका आहे. ऑक्टोबर महिन्यात २० ने वाढ झाली आहे, तर भाव ३ हजार ६६८ इतका आहे. सोयाबीनच्या इंदौर मार्केटमधील बाजारभावात ०.३५ टक्क्यांनी वाढ झाली असून हजर बाजारातील भाव ३ हजार ७४८ इतका आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट-१२ ऑगस्ट २०२०: जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

हळद – हळदीच्या ऑगस्ट महिन्यातील वायद्यात २८ रुपयांची वाढ आली आहे. वायद्यांचा भाव ५ हजार ७६४ इतका आहे. सप्टेंबर महिन्यात २२ रुपयांची वाढ झाली असून वायद्यांचा सप्टेंबरमधील भाव ५ हजार ८३० इतका आहे. हळदीचा निझामाबाद हजर बाजारातील वायद्यांचा भाव ५ हजार ५०० असून यात ०.२२ टक्क्यांची घट झाली आहे.

चना – चन्याचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वायदे अनुक्रमे ४ हजार १२० आणि ४ हजार १४७ रुपयांवर गेले आहेत. ऑगस्टच्या वायद्यात १२ तर सप्टेंबरच्या वायद्यात १३ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमधील चन्याच्या हजर बाजारातील भावात ०.५७ टक्क्यांनी वाढ झाली असून दर क्विंटल मागे ४ हजार १३९ रुपयावर पोहोचले आहेत.

वाचा:  वायदा बाजार अपडेट १२ ऑगस्ट २०२०: सोयाबीन, हळद, आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App