‘संपूर्ण कर्जमाफी द्यायला सरकारला ४०० महिने लागतील’

मुंबई | दीड महिन्यांच्या राजकीय संघर्षानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून महाविकासआघाडी सरकार स्थापन केले.सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामकाजावर ताशेरे मारले आहेत. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका सभेत केला.

फडणवीस म्हणाले, “एक नवा पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही. दोन महिन्यात फक्त १५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ४०० महिने लागतील” असं गणित देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. दरम्यान आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. ज्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

Read Previous

कालवे “म्हैसाळ’च्या पाण्याच्या प्रतीक्षेत

Read Next

संपुर्ण कर्जमुक्ती, दुष्काळी मदतीसाठी भाजपचे आंदोलन