ग्रामपंचायत सरपंचांनी मानले गावातील युवकांचे आभार

ई ग्राम : आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या  माहिती प्रमाणे पुढील १५ दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात शिल्लक आहे.  त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी पूर्ण राज्यातील  जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत झरे प्रशासनातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावातील तरूणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.

ग्रामपंचायतकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला  गावातील तरूणांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोना व्हायरस (कोविड १९)  हा व्हायरस तीव्र संसर्ग जन्य आहे. त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यातील एक भाग म्हणून सध्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेचा रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरास गावातील ८२ युवकांनी रक्तदान केले. या सर्व रक्त देणाऱ्या तरुणांचे ग्रामपंचायत सरपंच प्रशांत पाटील यांनी जाहीर असे आभार मानले आहेत.

Read Previous

डॉक्टरला होता कोरोना, हजार लोकं संपर्कात

Read Next

मुलगा डोक्यावर, पोट हातावर, कुंटुंब रस्त्यावर…