कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोनामुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर योग्य नियोजनासाठी अधिक निधी गरजेचा आहे. असे मत सरपंच परिषद, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी व्यक्त केले. काकडे यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाॅकडाऊनच्या काळातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि कोरोनाच्या संकटाला सध्या आपण सामोरे जात आहोत. या काळात सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. शहरातून मोठ्या प्रमाणात लोक गाव खेड्यात येत असले तरी ग्रामपंचायत कर्मचारी आणि सरपंच त्याची कर्तव्ये पार पाडत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने ग्रामपंचायतीला अधिकचा निधी द्यावा.

egram

30 मे
डाॅ. मिलिंद शिंदे
पशुआहार तज्ञ
विषय : वासरांचे संगोपन : आजची कालवड, उद्याची लक्ष्मी

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App