हरभरा दर मागणीमुळे टिकून; जाणून घ्या नवे बाजारभाव

Smiley face < 1 min

पुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी राहिली. परिणामी देशातील विविध बाजारांमध्ये दरात २० ते ५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. मध्य प्रदेशात हरभऱ्याला सरासरी ५१५० ते ५४०० रुपये, राजस्थानात ५१०० ते ५५०० रुपये, दिल्लीत ५२०० ते ५६०० रुपये आणि महाराष्ट्रात सरासरी ५२५० ते ५६०० रुपये दर मिळाले. खरिपातील कडधान्य पिकांना बसलेला फटका आणि निर्यातीतील अडथळे यामुळे हरभरा दर हमीभावाच्यावर टिकून राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सरकारने डाळींच्या वाढत्या दरामुळे आयातीला परवानगी, व्यापारी तसेच उद्योगांवर साठा मर्यादा आणि हरभऱ्यावर वायदाबंदी आदी निर्णय घेतले होते. त्यावेळी हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा खालच्या पातळीवर आले होते. मात्र वाढती मागणी आणि देशांतर्गत उत्पादनातील घटीमुळे निर्बंध असतानाही हरभऱ्याने पुन्हा हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे.

egram
वाचा:  विम्यावर शेतकरी टाकणार बहिष्कार, कारण...

देशातील बहुतांश बाजारपेठांमध्ये हरभऱ्याचे दर हे ५१०० ते ५६०० रुपयांच्या दरम्यान मिळत आहेत. वायदे बाजारातही सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील डिलेव्हरीचे सौदे हे हमीभावाच्यावर झाल्याने बाजार समित्यांमध्येही दर सुधारले आहेत.

वायद्यांमधील सुधारणा आणि मागणी असल्याने राजस्थानमधील बाजार समित्यांमध्ये ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. जयपूर बाजारात दर सुधारून ५२५० ते ५५०० रुपये, बिकानेरमध्ये ५१७० ते ५३५० रुपये, केकडी येथे ५०५० ते ५१०० रुपये आणि किशनगड बाजार समितीत ५००० ते ५२६० रुपये दर मिळाले.

वाचा:  संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर होणाऱ्या टिकेला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

दरम्यान, मध्य प्रदेशात मागणी काहीशी वाढली होती. त्यामुळे हरभरा दरात ५० ते १०० रुपयाने दर सुधारले होते. मध्य प्रदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये ४८०० ते ५५०० रुपये यादरम्यान दर होते.

राज्यातील दर
राज्यातील बाजार समित्यांत हरभरा आवकेत चढ-उतार पाहायला मिळाले. तसेच मागणीही कमी जास्त होती. परिणामी गेल्या आठवड्यात हरभरा दरात ५० ते १०० रुपयांपर्यंत चढ-उतार झाले. अकोला बाजार समितीत सरासरी ५२०० ते ५५७५ रुपये, नागपूरमध्ये ५३४० ते ५६७० रुपये, लातूर बाजार समितीत ५१९० ते ५७०० रुपये दर मिळाले. येणाऱ्या काळातही राज्यातील दर स्थिर राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

वाचा:  परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी नवे नियम, शाळांबाबतही योग्य निर्णय – अजित पवार

हरभरा बाजारातील स्थिती
ऑस्ट्रेलियातून जुलै महिन्यात हरभरा निर्यात घटली
खरीप कडधान्याला फटका बसल्याने हरभऱ्यावर भिस्त टिकून
कंटेनर जाहजांच्या तुटवड्याचा निर्यातीवर परिणाम
देशांतर्गत बाजारात दर हमीभावाच्यावर टिकून
सणांच्या पार्श्वभूमीवर हरभरा डाळीला वाढती मागणी

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App