पालकमंत्री पदच घटनाबाह्य; जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी

Smiley face < 1 min
पालकमंत्री पदच घटनाबाह्य; जनहिक याचिकेवर मंगळवारी सुनावणी

पुणे – पालकमंत्री हे पदच घटनाबाह्य असल्याची याचिका नुकतीच पुणे जिल्हा न्यायलयात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर व अन्य दोघांनी दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी (२८ जुलै) होणार आहे. त्यामुळे या याचिकेचा निकाल राज्यातील ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीच्या उच्च न्यायालयाच्या निकालावर परिणाम करु शकणारा असल्याचे याचिकाकर्ते टाकळकर आणि अ‍ॅड.दिपक भोपे यांनी सांगितले.

भारतीय राज्य घटनेत कुठेही पालकमंत्री हे पद अस्तीत्वात नाही. राज्यकर्त्यांनी स्वत:च्या हितासाठी आणि दिमाखासाठी अधिकारी वर्गसंच, प्रोटोकॉल, गाड्यांचा फौजफाटा, पोलीस फौजफाटा, त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांसह सर्व खात्यातील प्रमुख अधिका-यांना बैठकीची व्यवस्था वापरुन पालकमंत्र्यांना विशिष्ठ दर्जा बहाल केला आहे.

वाचा:  प्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बवर नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

हे जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने गैर आहे. पर्यायाने पालकमंत्रीपद घटनाबाह्य असल्याचे एक निवेदन काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पाठविले होते. यालाच अनुसरुन ही जनहित याचिका पुणे जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली असून या याचिकेची सुनावणी मंगळवारी होणार असल्याचे याचिकाकर्ते रमेश टाकळकर, संतोष शिर्के आणि अशोक बेंडभर यांनी दिली.

याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. दिपक भोपे, अ‍ॅड.आशिष टाकळकर आणि अ‍ॅड. तेजल आहेर हे काम पाहत आहेत. यासंदर्भात बोलताना
अ‍ॅड. भोपे यांनी सांगितले की, राज्यात गाजत असलेल्या सध्याच्या ग्रामपंचायत प्रशासक निवडीच्या निमित्ताने जो काही अधिकार पालकमंत्र्यांना दिला आहे. तो किती गमतीशीर आहे तेच आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतोय. मुळात घटनाबाह्य पदाला राज्य सरकार थेटपणे संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबतचे आदेश देतेच कसे. याबाबत आम्ही सर्व कायद्याच्या कसोट्यांवर टिकेल अशीच याचिका दाखल केलेली आहे.

वाचा:  राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपालांकडेच

दरम्यान, जनहित याचिका उच्च न्यायालयातच दाखल करावी लागते असे नाही. तर दिवाणी प्रक्रीया संहितेनुसार व्यापक जनहिताचा विचार करता जिल्हा न्यायलायतही अशी याचिका दाखल करणे शक्य आहे. त्यानुसारच आम्ही ही याचिका दाखल केली असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारला आम्ही प्रतिवादी केले असल्याची माहिती टाकळकर आणि अ‍ॅड. भोपे यांनी दिली.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App