राज्याच्या ‘या’ भागात गारठा वाढला; हवामान खात्याची माहिती

Smiley face < 1 min

पुणे – उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात थंडी कमी झाली आहे. बुधवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश ते उत्तर कोकण व उत्तर मध्य प्रदेश या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात आणि हिंदी महासागराच्या परिसरात चक्रीय वाऱ्यासाठी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर पोषक वातावरण तयार होत आहे.

वाचा:  ‘लोणार विकासाचा कृतिआराखडा सादर करा’

यामुळे राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत थंडी कमी झाली झाली असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांनंतर राज्यात हवामान कोरडे राहील. त्यामुळे थंडीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड आणि पश्‍चिम राजस्थान या भागांत आज थंडीची अति तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम राजस्थानमधील पिलानी येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर राज्यात जळगावमध्ये सर्वांत कमी तापमान होते.

वाचा:  धक्कादायक! शाळेत कोरोनाचा शिरकाव; तब्बल ‘एवढ्या’ विद्यार्थ्यांना लागण

दरम्यान, निफाड, नाशिक, नगर भागांतही चांगलीच थंडी होती. कोकणात किमान तापमानाचा पारा १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्र ११ ते २०, मराठवाड्यात १४ ते १८ आणि विदर्भात १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App