राज्यमंत्र्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये- हर्षवर्धन पाटील

Smiley face < 1 min

पुणे – इंदापूर तालुक्यात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. परंतू तालुक्याचे आमदार तथा राज्य मंत्री दत्तात्रय भरणे कुठलेही शासकीय निकष न पाळता गर्दीत सूरपाट्या खेळण्याचा तसेच स्वछायाचित्र असलेले पतंग उडविण्याचाआनंद घेत आहेत. राज्यमंत्र्यांनी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी कोरोना संकटकाळात स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये, अशी उपरोधिक टीका भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

वाचा:  भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर; नवाब मलिकांचा दावा

इंदापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असून रुग्ण संख्या १५० च्या आसपास गेली आहे. मात्र, कोरोना संसर्गरोखण्यासाठी भरणे यांच्याकडून शासकीय पातळीवर प्रभावी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. इंदापूर कोविड सेंटरमध्ये व्हेंटीलेटरसह विविध सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तालुक्यात भिगवण आणि इतर ठिकाणी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे.

वाचा:  खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, नागपूरवरून मुंबईला हलविले

कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचारांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात युवकांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असताना त्यांच्या बरोबर सूरफाट्या किंवा पतंग उडवण्याऐवजी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम राज्यमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या सहा वर्षापासून ते अपयशी ठरले आहेत. मंत्री पदावरील व्यक्तीने बेजबाबदारपणे न वागता कर्तव्याची जाणीव ठेवून जबाबदारीने वागणे आवश्यक असते. असेही पाटील म्हणाले आहेत.

वाचा:  अजित पवार राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत

जबाबदार पदावरील व्यक्तीने कोरोनाच्या संकट काळात सूरफाट्या खेळून व पतंग उडवत पोरकटपणे वागणे हे तालुक्याच्या संस्कृतीला धरून नाही. त्यामुळे कोरोनाची भीती घालवण्यासाठी राज्यमंत्र्यांनी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App