आरोग्य सहाय्यीकेला पोलिसांकडून बेदम मारहाण

ई ग्राम : कोरोनाशी लढण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच पोलीस यंत्रणा देखीलकामाला लागली आहे. राज्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी आहे. बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस मारहान करत असल्याचे व्हिडीओ आपण रोजच पाहत आहोत. मात्र, हे करत असताना पोलिस कसलाही विचार करत नसल्याच पहायला मिळत आहे. पोलीसांना सामान्य नागरिक आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यातला देखील फरक कळत नाही. असाच काही प्रकार काल आरोग्य सहाय्यीका प्रियंका राठोड यांच्यासोबत घडला आहे.

बुधवारी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सहाय्यीका म्हणून कर्तव्य पार पाडून वडील पोलिस जमादार यांच्यासोबत घराकडे जात असताना नांदेड नाक्यावर या दोघांचे काही ऐकून घेण्यापूर्वीच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रियंका राठोड ह्या आरोग्य सहाय्यीका म्हणून काम करतात.

मस्तानशहा नगर येथे कोरोना बाबत सर्वेक्षण करून गोरेगाव ठाण्यांतर्गत कनेरगाव नाका पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असलेले वडील पोलिस जमादार साहेबराव राठोड यांच्यासोबत बांगर नगरला आपल्या घरी जात असतात, नांदेड नाका येथे संचारबंदी कामी बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी त्या दोघांचे म्हणणे ऐकून न घेता, ओळखपत्र न पाहता, आम्ही आरोग्य कर्मचारी आहोत, वडील पोलिस जमादार आहेत हे सांगूनही मारहाण केली, असा आरोप आरोग्य सहाय्यीका प्रियांका राठोड यांनी केला आहे.

त्यांच्यावर हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला चार टाके पडले आहेत. विशेष म्हणजे संबंधित आरोग्य कर्मचारी ह्या कॅन्सर पीडित असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिले आहे.

मी कोरोना बाबत मस्तानशाहा नगर येथून सर्वे करून वडिलांसोबत घरी जात असताना नांदेड नाका येथे मला मारहान करण्यात आली. आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय ? पोलिसांकडून अशाप्रकारे अन्याय होत असेल तर आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी काम थांबू.

पीडित महिला कर्मचारी
Read Previous

कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

Read Next

पोलीस कर्मचार्‍यालाच पोलिसांची बेदम मारहाण