कोल्हापूरात मुसळधार सुरूच; पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, NDRF ची टीम रवाना

Smiley face < 1 min

कोल्हापूर : राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाच्या (havey rain) सरी कोसळत आहेत. कोल्हापूरातही (Kolhapur) पावसाने धुमशान घातलं आहे. जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे. बुधवारी हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी केला होता. पंचगंगेने नदी पात्र सोडले असून पाणीपातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. तर आतापर्यंत ७० पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूरच्या दिशेने NDRF रवाना
जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. यामुळे सतर्कता म्हणून पुण्याहून कोल्हापूर कडे NDRF च्या दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक मार्गावर नदीचं पाणी आलं आहे. जिल्ह्यातील कोल्हापूर गगनबावडा या मार्गावर मांडुकली इथं कुंभी नदीचं पाणी आल्याने कोल्हापुर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

egram
वाचा:  नुकसानग्रस्तांबाबत विजय वडेट्टीवारांनी प्रशासनाला दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे आधीचं सतर्कता म्हणून NDRF च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यातील एक तुकडी कोल्हापूर शहरासाठी असणार आहे, तर दुसरी तुकडी शिरोळ साठी असणार आहे. दुपारपर्यंत या दोन्ही तुकड्या आपल्या ठिकाणी दाखल होणार आहेत. पावसामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागात पुराच पाणी साचलं आहे.   

पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटापर्यंत पोहोचली असून यामध्ये गेल्या १२ तासात पाणी पातळी साडे तीन फुटांनी वाढली आहे. ज्या वेळी पंचगंगा नदी ३९ फुटांवर पोहचते त्यावेळी इशारा पातळी मानली जाते. आणि पंचगंगा ४३ फुटांवर पोहोचते त्यावेळी नदीने धोक्याची पातळी गाठलेली असते.

वाचा:  संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव नसल्यानेही शेतकरी हवालदिल

दरम्यान, जिल्ह्यात पावसामुळे पंचागंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे आतापर्यत ७० पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली गेले आहे. तर नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या पाणीपातळी ३५ फुटांपर्यंत पोहचली आहे. पंचगंगा हळूहळू धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App