महाराष्ट्रासह दक्षिण भारतात मुसळधार पाऊस तर उत्तर भारतात उष्णतेची लाट

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – उत्तर भारतातातील राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या राज्यात प्रचंड उष्णतेची लाट आहे. तर दक्षिण भारतात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिसा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह काही राज्यांना प्रचंड पावसाचा सामना करावा लागत आहे. पुढील १५ दिवस या राज्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात आणि छत्तीसगड, ओडिसामध्ये पाऊस कमी होत जाईल, असा अंदाज आहे.

वाचा:  पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; बंगालच्या उपसागरावर कमी दाब

उत्तर महाराष्ट्रात काही भागात मध्यम पाऊस पडेल. तर १५, १६ आणि १७ सप्टेंबरलाही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सरू असून काही ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस राहील. तर कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या भागात जोरदार पाऊस होईल. रविवारी आणि सोमवारी (१३, १४ सप्टें.) पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि सांगली या भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर पश्चिम कोकणात सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस पुढील काही दिवस सुरूच राहील.

वाचा:  राज्यात पावसाचा जोर कमी होणार; पण...

मराठवाड्यात पुढील दोन दिवस अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या भागात १४, १५ आणि १६ सप्टेंबरला अधिक जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात १३ सप्टेंबरला काही ठिकाणी पाऊस पडेल. तर १५ आणि १६ तारखेला अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये प्रचंड पाऊस पडेल.

वाचा:  राज्यात पुढील ३ दिवसांत अतिवृष्टी; हवामान खात्याचा इशारा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App