औरंगाबाद जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टी

Smiley face < 1 min

औरंगाबाद – मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील जवळपास १५७ मंडळांत शनिवारी (१२ सप्टेंबर) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने दमदार हजेरी लावली. तर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड आणि औरंगाबाद मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

यंदा पावसाचे प्रमाण अधिक दिसत असले ठराविक ठिकाणी अधिक तर इतर ठिकाणी पावसाचा थेंबही नाही. असाही पावसाचा लहरीपणा काही भागातील शेतकऱ्यांना अनुभवाला येतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी पडणारा पाऊस पिकांना जीवदान देणारा तर काही ठिकाणी सततच्या पावसाने शेतीचे आणि पिकाचे नुकसान, असे चित्र सध्या उभे राहिलेले आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील ४४ मंडळांत पावसाची हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली.

वाचा:  राज्यात येत्या दोन दिवसात मुसळधार; हवामान खात्याचा अंदाज

कन्नड तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील कन्नड मंडळात ६८ मिलिमीटर तर औरंगाबाद मंडळात ६५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. त्यापाठोपाठ करमाड मंडळात ४१ मिलिमीटर, वरुडकाजी २६, आमठाणा २५, बोरगाव बाजार ४२, लासुरगाव २८, मांजरी २२, किशोर २४, करंजखेडा २१, देवगाव रंगारी २५ , चापानेर ४८, चिंचोली लिंबाजी २५, वेरूळ ३० तर सुलतानपूर मंडळांत २५ मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ मंडळात तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील वाशी मंडळात २५.८, भूम २४.३, अंभी मंडळात २१ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

वाचा:  राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

लातूर जिल्ह्यातील २७ मंडळात हजेरी लावणारा पाऊस हलका, मध्यम ते दमदार स्वरूपाचा होता. जिल्ह्यातील अंधोरी मंडळात ४४.३, सकनी ४६, घोनसी २१, शिरूर ताजबंद ३३.५, तोंडार ३३.५, हेर २१, वाढवणा २७.३, तर खंडाळी मंडळात २८ मिलिमीटर पाऊस झाला. तर बीड जिल्ह्यातील ४७ मंडळात हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील तिंतरवणी मंडळात ४५, रायमोहा २२.६, पिंपळगाव २२, शिरसाळा २७.८, आष्टी ३१ तर पाली मंडळात ४३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वाचा:  राज्यात पावसाचा जोर कमी होणार; पण...

जालना जिल्ह्यातील १३ मंडळांत तुरळक, हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला. दाभाडी मंडळात सर्वाधिक ६३ मिलिमीटर तर बावणे पांगरी मंडळातील २१.८, बदनापूर २१.८, रोहिलागड २०.३ आणि रामनगर मंडळात ५९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App