सावधान! हवामान खात्याने दिलाय ‘या’ ८ जिल्ह्यांना हाय अलर्ट

Smiley face < 1 min

ई ग्राम : नैऋत्य मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनने हर्नाई, सोलापूर, जगदाळपूर असा प्रवास सुरू केला आहे. शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. आता पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी खूप मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वीही पावसाने मुंबई, ठाणे, नांदेड, हिंगोली तसेच मराठवाड्यात हजेरी लावली होती. काही ठिकाणी आज पावसाच्या जोरदार सरी देखील पहायला मिळाल्या.

वाचा:  बाजारभाव अपडेट-०७ जुलै २०२० : जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

यासंदर्भात हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ८ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

शनिवारी आणि रविवारी मुंबई, ठाणे, पुणे, नगर या भागांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वाचा:  राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रीय होण्याची शक्यता

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App