सत्तासुंदरी गेल्यामुळं त्यांची अवस्था भ्रमिष्ठासारखी; शेलारांवर शेट्टींचा प्रहार

Smiley face < 1 min

सांगली – केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता किसान मोर्चा यांच्यातर्फे गुरूवारपासून किसान आत्मनिर्भर यात्रेला सुरूवात झाली. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी स्वाभिमानी शेतकरी संगटने प्रमुख राजू शेट्टींवर निशाणा साधला होता.

राजू शेट्टींची अवस्था ही पिंजरा चित्रपटातल्या मास्तरसारखी झाली आहे. आमदारकीच्या मोहापायी ते आडत आणि दलालांची वकिली करत असल्याची टीका शेलारांनी केली होती. आता या शेलारांच्या टीकेवर गप्प बसतील ते शेट्टी कसले त्यांनीही शेलारांचा अगदी शेलक्या शब्दात समाचार घेतला.

वाचा:  कृषी कायद्यांवरून केंद्रीय कृषीमंत्र्यांचं ‘हे’ मोठं वक्तव्य

नेमकं काय म्हणाले शेट्टी
सत्तासुंदरी हातातून निसटल्यामुळं आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा-सारखी झाल्याचा टोला शेट्टींनी लगावला आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्षपद मिळवताना पवारांचे पाय कोणी चाटले होते? याचे उत्तर आधी द्या, असा खोचक टोला शेट्टींनी शेलारांना लगावलाय. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजून लढत आहोत. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही रस्त्यावर उतरल्याचे शेट्टी म्हणाले.

वाचा:  ‘या’ दोन जिल्ह्यातील कृषिपंपधारकांनी भरले ५१ कोटींचे थकीत वीजबिल

स्वाभिमानी काढणार कडकनाथ संघर्ष यात्रा
कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ काढलेल्या या किसान आत्मनिर्भर यात्रेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी देखील निशाणा लगावलाय. सदाभाऊ खोत यांनी किसान आत्मनिर्भर यात्रा काढण्यापेक्षा कडकनाथमध्ये ज्या शेतकऱ्यांना गंडा बसलाय त्यांच्यासाठी न्याय यात्रा काढली असती तर बर झालं असत. त्याच आम्ही स्वागत केलं असतं अस खराडेंनी म्हटलंय. त्यामुळे कडकनाथमध्ये शेतकऱ्यांना फटका बसला आहे, त्यांच्या न्यायासाठी आम्ही कडकनाथ संघर्ष यात्रा काढणार असल्याचे खराडेंनी सांगितले.

वाचा:  ‘हा’ जिल्हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; लॉकडाऊनची शक्यता

दरम्यान, २४ ते २७ डिसेंबर या काळात रयत क्रांती संघटना आणि भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने किसान आत्मनिर्भर यांत्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काढण्यात येत आहे. या यात्रेदरम्यान राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता शेलार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साधलेल्या निशाणावर ते काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाच ठरणार आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App