‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’

Smiley face < 1 min

पुणे : आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात आज चर्चा झाली आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य केल्या जातील. तसंच आशा वर्कर्स यांच्याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

यावेळी टोपे म्हणाले की, आशा वर्कर्स यांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्या कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाहीत. असं ठरलं आहे. सरकार त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेईल. ज्या आशा वर्कर्स आंदोलन करत असतील तर ते चुकीचे आहे. आशा वर्करला सगळी मदत केली जातं आहे. ज्या मागण्या योग्य आहेत त्या मान्य केल्या जातील. मात्र त्यासाठी त्यांनी आंदोलन करणे योग्य नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.

वाचा:  फुटाने वाढले, इंचाने ओसरू लागले; कोल्हापुरात संथगतीने पाणी कमी

राज्यातील आशा वर्कर्स आजपासून संपावर
योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी आजपासून राज्यातील आशा वर्कर्सने संपाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संपर्क सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सने घेतला आहे. यानुसार राज्यातील ७२ हजाराहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करत आहेत.

वाचा:  धोकादायक गावांचे होणार सक्तीने पुनर्वसन - उपमुख्यमंत्री अजित पवार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App