गृहिणींनो आता दुधी भोपळ्यापासून बनवा टुटीफ्रूटी अन् पावडर

Smiley face 2 min

टीम ई ग्राम – बऱ्याचदा जेवणात दुधी भोपळ्याची भाजी दिसली की बरेच जण नाक मुरडतात. मात्र, जरी तुम्हाला जेवणात भोपळ्याची भाजी आवडत नसली तरी यामधील शरीरासाठी पोषक असणारे तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्वे असतात. याशिवाय दुधी भोपळ्यात प्रामुख्याने थायमीन, लोह, मॅग्नेशिअम. कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम सारखे पोषक घटक असतात. दुधी भोपळ्याची भाजी जरी कोणाला आवडत नसली तरी त्यापासून वेगवेगळे चविष्ट असे पदार्थ बनवता येतात. तसेच दुधी भोपळ्यामध्ये औषधी गुणधर्म देखील असतात.

दुधी भोपळ्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ –

टुटीफ्रूटी –
पिकलेला दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. बोजणीच्या साह्याने त्याला लहान छिद्रे पाडून २ ते ३ सेंमी लांबीचे तुकडे करावेत. हे तुकडे उकळत्या पाण्यात २-३ मिनिटे गरम करावेत. नंतर ५० टक्के साखरेच्या पाकात तुकडे टाकून त्यात ०.२ टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे. हे मिश्रण २४ तास मुरवण्यासाठी ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्याच पाकामध्ये साखर टाकून साखरेचे प्रमाण ६० टक्के करावे. आणि पुन्हा २४ तास मुरण्यासाठी ठेवावे. शेवटी ७० टक्के साखरेच्या पाकात ५ ते ६ तास काप ठेवावेत. सहा दिवसानंतर काप साखरेच्या पाकातून काढून चांगले निथळून घ्यावेत. सावलीत किंवा पंख्याखाली ४८ तासांपर्यंत वाळवावे. तयार टुटीफ्रूटीची स्वच्छ ठिकाणी साठवण करावी.

वाचा:  बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकी

दुधीची पावडर –
दुधी भोपळ्याची पावडर करण्यासाठी पिकलेला दुधी भोपळा घ्या. भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे पातळ काप करा. हे कापलेले पातळ काप ८० अंश सेल्सिअस तापमानात ४ मिनिटे गरम पाण्याची प्रक्रिया (ब्लिचींग) करावी. वाळवण यंत्रामध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानास १५ ते १६ तास काप वाळवावेत. काप पूर्ण वाळल्यानंतर ग्राइंडर मशीनमधून त्याची पावडर तयार करून घ्यावी. तयार पावडर चाळून प्लॅास्टिकच्या पिशवीमध्ये भरून सील करावी. याची थंड किंवा कोरड्या वातावरणात साठवण करावी. साधारणतः १ किलो भोपळ्यापासून ६० ग्रॅम पावडर मिळते.

दुधी भोपळ्याची वडी –
पिकलेला दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढावी. दुधीचे मोठे मोठे काप करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. नंतर दुधीभोपळा किसून घ्यावा. किसाचे वजन करून मंद आचेवर तुपामध्ये परतून घ्यावा. त्यामध्ये गरजेप्रमाणे साखर, विलायची पूड, दूध पावडर टाकून घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर ते तूप लावलेल्या परातीमध्ये ओतावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून त्यावर सुकामेव्याची पूड लावावी.

वाचा:  बळीराजा संकटात! निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकरी संतापले

दुधी भोपळ्याचे औषधी गुणधर्म –
1) ज्यांना ह्रदय विकाराचा त्रास आहे अशा रुग्णांनी सकाळ आणि संध्याकाळी १ वाटी दुधीचा रस घ्यावा. दुधीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच
वजन कमी करण्यासाठी दुधीचा रस फायदेशीर आहे.

2) लहान मुलांच्या छातीत जर कफ झाला असेल तर दुधीचा रस आटवून त्यात मिरे पिंपळी वाटून मधात मिसळून त्याचे चाटण करावे. हे चाटण दिल्यास मुलांच्या छातीतील कफ कमी होण्यास नक्कीच मदत होते.

वाचा:  कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर उदयनराजे संतापले, म्हणाले...

3) तुम्हाला जर रात्री झोप येत नसेल तर एक चमचा आवळा चूर्ण, दुधी भोपळ्याच्या रसात रात्री कोमट पाण्यातून घेतल्याने झोप चांगली लागते आणि पोटही साफ होते.

4) त्वचेची कांती उजळण्यासाठी दुधीचा रस, जायफळाची पावडर आणि मध एकत्रित करून लावल्यास त्वचा उजळते आणि फरक दिसतो.

5) जर तुम्हाला मुत्रविकारासंबंधित काही व्याधी असतील तर १ वाटी दुधीचा रस, १ चमचा लिंबू रस आणि १ चमचा मध एकत्रित करून सकाळ संध्याकाळ घेतल्यास मूत्रविकार कमी होण्यास मदत होते.

6) मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा गुणकारी मानला जातो. दुधीमधील मधुमेह विरोधी गुणधर्म रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

7) दुधी भोपळ्याचा रस शरीरासाठी पौष्टिक असतो. रोज सकाळी १ ग्लास दुधीचा रस पिल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

8) केसांच्या आरोग्यासाठी दुधी रस तेलात मिसळून केसांना लावावा. केस मजबूत होऊन वाढण्यास मदत होते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App