कोरोनाच्या टेस्ट करण्यासाठी किती येतो खर्च? वाचा सविस्तर

ई ग्राम : जगभर कोरोनाने हाहाकार घातला आहे. त्याला रोखण्यासाठी सर्व देश मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करत आहेत. या विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कोरोनाचा प्रसार झपाट्याने पसरत आहे. या संकटापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, स्वतःला इतरांपासून लांब ठेवणे, सामाजिक दुरावा पाळणे आणि एखादी व्यक्ती कोविड-पॉझिटिव्ह आहे की नाही हे ठरवण्यासाठी तत्काळ चाचणी करून घेणे.

सध्या देशात आपण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. रुग्णांच्या संख्येत घट होत आहे की या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे, हे येत्या काही आठवड्यांमध्ये ठरणार आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना संशयित रुग्णांपासून वेगळे ठेवण्यासाठी झटपट व प्रभावी चाचणी हा एकच उपाय आहे.

सध्या कोरोनाबाबत महत्त्वाच्या असणाऱ्या तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यात व्यक्तीच्या नाकपुड्या किंवा घसा यातून स्वॅबने सॅम्पल घेणे, रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट आणि रक्त चाचणी. पहिल्या चाचणीमध्ये स्वॅब नमुने घेतले जातात आणि व्हायरल ट्रान्स्पोर्ट मीडिअम (व्हीटीएम) कंटेनरमधून हे नमुने चाचणी केंद्राकडे पाठवले जातात. हे कंटेनर विषाणूंना कैद करून ठेवते.

अलीकडच्या काळात,  केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांनी काही खासगी रुग्णालयांना व लॅबना नमुने गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. परंतु, खासगी रुग्णालयांची भूमिका सध्या नमुने गोळा करण्यापुरती आणि हे नमुने जवळच्या चाचणी केंद्राकडे पाठवण्यापुरती मर्यादित आहे. तसेच, खासगी डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीजना होम-टेस्टिंगची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये, रुग्णांना घरबसल्या चाचणी करून घेता येते.

नमुने घेणारी व्यक्ती हे नमुने अतिशय काळजीपूर्वकपणे व्हीटीएम कंटेनरमधून जवळच्या चाचणी केंद्राकडे पाठवते. रुग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह आहे की नाही, हे कळण्यासाठी या चाचणीला ४८ तासांपर्यंतचा अवधी लागतो व या चाचणीसाठी ४५०० रुपये खर्च येतो. परंतु, सध्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तरच ही चाचणी होम-टेस्टिंग पद्धतीने केली जाते.

Read Previous

महाराष्ट्राची चिंता वाढली, कोरोनामुळे चौथा बळी

Read Next

कोरोनाच्या किती टेस्ट होतात, आणि कोणत्या? वाचा सविस्तर