डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ कसा काढायचा; मग हे वाचा

Smiley face 2 min
डिजिटल सातबारा

टीम ई ग्राम – शेतजमिनीचा किंवा जागेचा सातबारा काढायचा म्हटलं की, आपल्याला तलाठी कार्यालयात खेटे घालावे लागतात. मात्र, आता तुम्ही घर बसल्या तुमच्या स्मार्ट फोनवरून पाच मिनिटातच डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढू शकता. त्यामुळे आता तुम्हाला तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची अजिबात गरज पडणार नाही. महाराष्ट्र सरकारचा महसूल विभाग राबवत असलेल्या ई- फेरफार या मोहिमेमुळे आता डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाईन सातबारा काढणे सहज सोपे झाले आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा, ८- अ, जमिनीचा फेरफार असे जमिनी संबंधित कागदपत्रे ऑनलाईन उपलबध्द होणार आहेत.

राज्यात साधारणत: २ कोटी ५२ लाख सातबारे आहेत. हे सर्व सातबारे गेल्या चार वर्षांपासून ऑनलाईन उपलबध्द आहेत. यापैकी २ कोटी ४९ लाख सातबाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर बँकांनी राज्य सरकारशी करार केला आहे. त्यानुसार महसूल विभागा बँकांना सातबारा, ८- अ, फेरफार ही शेतीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन उपलबध्द करून देत आहे. ज्या बँकांनी सरकारशी करार केला आहे, त्या बँकांना ही सुविधा उपलबध्द करून देण्यात आली आहे. राज्यभरातील १८ बँकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयात चकारा माराव्या लागणार नाहीत.

वाचा:  कंगना पुन्हा बरळली; शेतकऱ्यांना म्हणाली दहशतवादी

डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा कसा काढायचा –
डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ सर्च करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सराकरच्या महसूल विभागाची वेबसाईट उघडेल. या वेबसाईटच्या उजव्या बाजूला तुम्हाला डिजिटल सातबारा पाहण्यासाठीचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ”आपला ७/१२” नावाचे पेज उघडेल. या वेबसाईटवर जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर तु्म्ही लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून या साईटवरील सेवांचा लाभ घेवू शकता.

लॉगिन आयडी तयार कसा करायचा –
तुम्ही पहिल्यांदाच या साईटवर सातबारा काढण्यासाठी आला असाल तर तुम्हाला New User Registration या पर्यायावर क्लिक करून लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. जसे की तुमचे नाव, लिंग, राष्ट्रीयत्व, तुम्ही काय करता (नोकरी, व्यवसाय, इतर), मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि जन्म तारिख ही माहिती द्यायची आहे. यानंतर तुमच्या पत्त्याविषयीची माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्ही तुमचा पिन कोड टाकला की, तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि राज्याचे नाव तेथे येईल. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी तयार करायचा आहे. यामध्ये लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. एकदा लॉगिन आयडी तयार झाला की, स्क्रिनवर रजिस्ट्रेशन कंप्लिट असा मेसेज दिसेल. तिथेच तुम्हाला Click Here या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही सातबाऱ्याच्या पेजवर जाल. त्याठिकाणी तुम्हाला तुम्ही तयार केलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.

वाचा:  अभुतपूर्व गोंधळात राज्यसेभेत कृषी विधेयक मंजूर

आता तुमच्यासमोर ”डिजिटल स्वाक्षरीत ७/१२” हे पेज उडलेले दिसेल. या पेजवर सगळ्यात खालच्या बाजूला एक सुचना दिली आहे. या सुचनेत प्रत्येत साताबारा काढण्यासाठी १५ रुपये शुल्क लागेल आणि हे पैसे तुमच्या उपलबध्द बॅलन्समधून कापले जाईल. तुम्ही नविन नोंदणी केलेली असल्यामुळे तुमच्या खात्यात बॅलन्स असणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही खाली दिलेला रिचार्ज अकाउंट या पर्यायावर क्लिक करून डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेच बँकींग किंवा भीम युपीआयद्वारे पैसे जमा करू शकतो.

वाचा:  देशात कुठेही युरिया टंचाई नाही - केंद्र सरकार

यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर त्याठिकाणी तुमच्या खात्यात तुम्ही जमा केलेली रक्कम दिसेल. यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढण्यासाठी समोर दिलेल्या फॉर्मवर माहिती भरायची आहे. यात तुम्हाला जिल्ह्ययाचे नाव, तालुक्याचे नाव, गावाचे नाव ही माहिती भरायची आहे. यानंतर सर्व्हे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे. यावर तुम्ही टाकलेला गट नंबरचा डिजिटल सातबारा उपलबध्द आहे की नाही ते दिसेल. जर याठिकाणी तुम्ही टाकलेल्या गट नंबरचा सातबारा उपलबध्द असेल तर खाली दिलेल्या डाऊनलोडच्या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही दिलेल्या गट नंबरचा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा तुमच्या समोर असेल. या सातबाऱ्यावर हा सातबारा कोणत्या तारखेला डिजिटल स्वाक्षरीसह तयार झाला आहे, याची माहिती सातबाऱ्याच्या खालच्या बाजूला दिली असेल. हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीने तयार केला असल्यामुळे या सातबाऱ्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज लागणार नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हा सातबारा तुम्ही अधिकृतरित्या वापरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही काही मिनिटातच डिजिटल स्वाक्षरीचा साताबारा घर बसल्या काढू शकता.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App