आधारकार्ड शिवाय कसे शोधाल पीएम आवास योजनेत नाव; वाचा सविस्तर

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गृह कर्जावर क्रेडीट लिंक्ड सब्सिडी दिली जाते. या योजनेचा आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. शहरी आणि ग्रामीण भागातील अर्जदारांची यादी केली जाते. या योजनेसाठी अर्ज केला असेल तर या योजनेच्या यादीमध्ये आपले नाव कसे शोधावे. तसेच आधारकार्ड शिवाय लाभार्थी यादीत नाव शोधायचे असेल तर यासाठी आपल्याला या योजनेच्या लिंकवर जावे लागेल.

या लिंकवर गेल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना शहरी यादीमध्ये आपण आपले नाव तपासू शकतात. यासाठी जर आपल्याकडे स्टेटस तपासण्यासाठी आधार नंबर नसेल तर तुम्ही यादीत व्यक्तिगत माहिती टाकू शकतात. यामध्ये मोबाईल नंबर किंवा असेस्मेंट आयडीसह सर्वजण याची माहिती घेऊ शकतात. यासाठी https://pmaymis.gov.in/Trac_Application_Status.aspx या संकेतस्थळावर जावून आपली व्यक्तिगत माहिती त्यात भरावी लागेल. त्यानंतर आपल्या समोर संपुर्ण माहिती येईल. ही माहिती आपण सोप्या पद्धतीने आणि विना आधार नंबरच्या मदतीने जाणून घेऊ शकतात.

egram

दरम्यान, आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्जही करु शकतात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायाचा. ऑनलाईन करताना अनेक प्रकारच्या चुका आपल्याकडून होत असतात. यासाठी या योजनेत ऑनलाईन अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. जेणेकरून अर्ज भरताना आपल्याकडून काही चुका होऊ नयेत.

सर्वात आधी पीएम आवास योजनाच्या अधिकृत संकेतस्थळ http://pmaymis.gov.in ही वेबसाईट उघडावी. होमपेजवर citizen Assessment मध्ये असलेल्या Benfits under other 3 componenets वर क्लिक करावे. check Aadhar /VID No. Existence या शीर्षकाचे नवे पेज ओपन होईल. तेथे आधार नंबरची नोंदणी करा. त्यानंतर check बटन दाबा. त्यानंतर तुम्ही अॅप्लीकेशन फॉर्म म्हणजे ऑनलाईन फार्मवर रिडायरेक्ट केले जाईल. यानंतर आपल्या समोर एक अर्ज येईल. त्यात आवश्यक असलेली माहिती काळजीपूर्वक भरा. लाभार्भीचे नाव, मोबाईल, नंबर, ईमेल, सर्व वैयक्तिक माहिती, इनकम स्टेटमेंट, बँक खात्याची माहिती या गोष्टी विचारल्या जातील. आता कॅप्चा कोड नोंदवा, आणि सेव्ह वर क्लिक करुन फाईल सेव्ह करा, आपल्या आवश्यक असल्याच प्रिंटही काढू शकता.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App